हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झालं असून मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही नेत्यांनी मंत्रिमंड न मिळाल्याने नाराजी व्यक्त केल्याचं पहायला मिळालं होत. त्यातच आता हे नाराज आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दवावं करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळ उडवून दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तार होत नाही आणि आम्हाला मंत्रिपद मिळेल, असं वाटत नाहीय. त्यामुळे आम्ही शिंदे-फडणवीस सरकार सोडून येण्याच्या मनस्थितीत आहोत, असे जवळपास 12 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. मात्र याबाबत खुद्द जयंत पाटील यांना विचारलं असता मला याबाबत काही माहित नाही असं उत्तर त्यांनी दिल.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमच्या संपर्कात 15-16 आमदार असल्याचा दावा केला होता. मंत्रिमंडळात संधी न दिल्याने हे आमदार नाराज आहेत. आपण उगीच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सोडलं अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे असेही खैरे यांनी म्हंटल होत. त्यातच आता मिटकरींनीही असाच दावा केल्याने राज्यात पुन्हा राजकीय खळबळ उडणार का अशी शंका निर्माण झाली आहे.