लोणंद प्रतिनिधी | सुशिल गायकवाड
पाडेगाव (ता.खंडाळा) येथील मांगल्य शिक्षण प्रसारक संस्थेच्या समता आश्रम शाळेतील 12 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केलेल्या तपासणीत आवाहातून स्पष्ट झाले आहे. या सर्व बाराही विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नसल्याने त्यांना आश्रम शाळेतीलच संस्थात्मक विलिगीकरण कक्षात ठेवलेले आहे. तरी पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक उत्तम गणपत माने यांनी केले आहे.
आश्रमशाळेतील चाळीस विद्यार्थ्यांचे घेतलेले नमुने निगेटीव्ह आलेले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणुन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत असताना शालेय विद्यार्थ्यांना ही या कोरोनाचा सामना करावा लागत आहे. पुसेगाव पाठोपाठ इतरत्र शाळांमधून ही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, कोरोनावर अटकाव आणण्यासाठी खंडाळा तालुक्यातून विविध उपाययोजना अंमलात आणल्या जात असून कोणीही विना मास्क सार्वजनीक ठिकाणी फिरु नये .तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात यावा. सार्वजनीक ठिकाणी कोणत्याही प्रकारची गर्दी करु नये,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जाॅईन करा????????
Click Here to Join Whatsapp Group