संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त खंडाळा तालुक्यातून चरित्र पुस्तक आणि प्रतिमा वाटप

लोणंद प्रतिनिधी | सुशिल गायकवाड

संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत संत रविदास जयंती महोत्सव खंडाळा तालुका व चर्मकार विकास संघ खंडाळा तालुका यांचे संयुक्त विद्यमाने तालुक्यातून संत रविदास महाराज यांचे चरित्र पुस्तक व प्रतिमा वाटप करण्यात आलेल्या आहेत.संत रविदास महाराज यांचे विचार बांधवांमध्ये पोहचवित जयंती निमित्त संत रविदास महाराज यांना अभिवादन करताना एक चांगले कार्य संत रविदास जयंती महोत्सव व चर्मकार विकास संघाकडून घडलेले असून या कार्याचे खंडाळा तालुक्यातून विशेष कौतुक होते आहे.

खंडाळा सह तालुक्यातील सर्व गावांतून भेटी देत हा उपक्रम राबविण्यात आला.काही भागांमध्ये जयंती साजरी होत नाही.जयंती सर्वत्र साजरी व्हायला हवी. यासाठी जयंती साजरी करण्याची विनंती करण्यात आली. शासकीय निमशासकीय सर्वत्र ठिकाणी संत रविदास महाराज यांची जयंती साजरी व्हावी म्हणून काही दिवसांपूर्वी चर्मकार विकास संघाकडून प्रशासनास निवेदन देण्यात आलेले होते.

आज तालुक्यातून ठीक ठिकाणी जयंती साजरी झाल्याचे समाधान संत रविदास जयंती महोत्सव खंडाळा तालुका व चर्मकार विकास संघ खंडाळा तालुका यांचेकडून व्यक्त करण्यात आलेले आहे.यावेळी भेटी दरम्यान समाज बांधवांना कोण कोणत्या अडी अडचणी भेडसावत आहेत त्याची माहिती घेऊन. भविष्यात बांधवांच्या अडी अडचणी साठी, हितासाठी सदैव हजर राहू याची ग्वाही देण्यात आली.यावेळी नामदेव भोसले,सुरेश कांबळे, रत्नकांत भोसले,किरण डोईफोडे, निलेश कांबळे, किरण मोरे, धर्मेंद्र वर्पे, कमलेश भंडारे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like