विमानतळाबाबत वर्षभरातच 12 हजार तक्रारी? त्याही एकाच व्यक्तीकडून; नेमकं काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणतेही आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विमानसेवेसाठी तक्रारी येणे ही कधीही चांगली गोष्ट नाही. यामुळे त्यांचे रेटिंग, रँकिंग आणि प्रवाशांच्या संख्येवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत जरा विचार करा की, जर एकाच विमानतळावर वर्षभरात 12 हजारांहून जास्त तक्रारी आल्या तर आणि त्यापैकी बहुतेक फक्त एकाच व्यक्तीकडून असेल तर प्रकरण किती गंभीर असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. असाच काहीसा प्रकार डब्लिन विमानतळाबाबत घडले आहे.

डब्लिन येथे एका व्यक्तीने विमानतळाबाबत एकुण 12,272 तक्रारी दाखल केल्या आहेत. विशेष म्हणजे या व्यक्तिने दाखल केलेल्या तक्रारी वर कोणताही उपाय सदर विमानतळाकडे नाही. या माणसाने आपल्या 90 टक्के तक्रारींमध्ये एकच गोष्ट सांगितली आहे की, विमानतळावरून खूप आवाज येतो. या व्यक्तीने दररोज सुमारे 34 तक्रारी दाखल केल्या आहेत.

2020 मध्येही याच व्यक्तीने विमानतळाकडे 6,227 तक्रारी दाखल केल्या होत्या, ज्यामध्येही मोठ्या आवाजाबाबत सांगण्यात आले होते मात्र तक्रारदार यामध्ये आपले नाव लिहीत नाही. डब्लिन विमानतळ प्राधिकरणाकडे यापूर्वीही आवाजाच्या तक्रारी येत आहेत. विमानतळाजवळ राहणार्‍यांसाठी हा त्रासदायक ठरतो. विशेषत: पोर्टमार्नॉक, स्वॉर्ड्स, वॉर्ड आणि सेंट मार्गारेट येथून आवाजाच्या तक्रारी आल्या आहेत.