जिल्ह्यात धावल्या 126 बसेस, तर 950 कर्मचारी परतले कामावर

औरंगाबाद – औरंगाबाद विभागात आत्तापर्यंत 950 कर्मचारी कामावर परतले आहेत. काल दिवसभरात औरंगाबाद विभागातून 126 बस धावल्या. या बसेसने 364 फेऱ्या करत 4 हजार 497 प्रवाशांना इच्छित स्थळी सोडले. पुणे मार्गावर 15 तर नाशिक मार्गावर 8 खाजगी शिवशाही बसेस चालवण्यात आल्या.

सिडको बसस्थानकातून 1 हिरकणी, 29 लालपरीने 74 फेऱ्या केल्या. यातून 601 प्रवाशांनी प्रवास केला. तर मध्यवर्ती बस स्थानकातून 23 शिवशाही बस ने नाशिक व पुणे मार्गावर 33 फेऱ्या केल्या. तर 18 लालपरीने 42 फेऱ्या केल्या. याचा लाभ 2001 प्रवाशांनी घेतला. पैठण डेपोने 17 लालपरी चालवत 48 फेऱ्या केल्या. यात 597 प्रवाशांनी प्रवास केला. सिल्लोड डेपोतून 4 लालपरी चालवत 16 फेऱ्या झाल्या यातून 238 प्रवाशांनी प्रवास केला.

वैजापूर डेपोतून 5 बसने 24 फेऱ्या केल्या असून, त्याचा लाभ 120 प्रवाशांनी घेतला. तर कन्नड डेपोतील 23 बसने 103 फेऱ्या करून 682 प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी सोडले. गंगापूर डेपोने 3 बसच्या माध्यमातून 16 फेऱ्या केल्या. त्याचा लाभ 189 प्रवाशांनी घेतला. सोयगाव डेपोतून 1 हिरकणी आणि 3 लालपरीच्या माध्यमातून 63 प्रवाशांना इच्छित स्थळी सोडले.