हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही त्यापैकीच एक योजना आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात 2-2 हजार रुपये पाठविले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्ते पाठवले आहेत. आता लवकरच 12 व्या हप्त्याचे पैसेही पाठविण्यात येणार आहेत.
PM Kisan ही केंद्र सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्ते पाठवले आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांनी केवायसी अपडेट केलेले आहेत त्यांनाच हे पैसे दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच या संबंधीचे एक ट्विट केले आहे. ज्यानंतर आता लवकरच 12 व्या हप्त्याचे पैसे खात्यात येतील.
पीएम मोदींनी ट्विट मध्ये काय म्हंटले
PM Kisan या योजनेच्या यशाबाबत पीएम मोदींनी ट्विट करत म्हटले की,” देशाला आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचा अभिमान आहे. ते जितके बलवान असतील तितका आपला देश अधिक समृद्ध होईल. पीएम किसान सन्मान निधी आणि इतर कृषी संबंधित योजना देशातील करोडो शेतकऱ्यांना नवीन बळ देत आहेत याचा मला आनंद आहे.”
12वा हप्ता कधी मिळणार ???
31 मे रोजी केंद्र सरकारकडून PM Kisan योजनेअंतर्गत 11 व्या हप्त्याचे पैसे जारी करण्यात आले होते. यादरम्यान 10 कोटींहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 21 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. हे लक्षात घ्या कि, प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान तर तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान ट्रान्सफर केला जातो. प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.
हप्त्याचे स्टेट्स कसे तपासायचे ???
शेतकऱ्यांना त्यांच्या हप्त्याचे स्टेट्स तपासण्यासाठी PM Kisan च्या वेबसाइटला भेट द्या.
“Farmers Corner” जाण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यानंतर “Beneficiary Status” या पर्यायावर क्लिक करा.
नवीन पेज उघडल्यावर त्यात आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
यानंतर, सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर स्टेट्सबाबतची संपूर्ण माहिती मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://pmkisan.gov.in/
हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिला मोठा नफा !!!
‘या’ 5 चुकांमुळे थांबवला जाऊ शकतो ITR Refund !!!
RBI कडून रेपो दरातील सलग तिसऱ्या वाढीनंतर आता पुढे काय होणार ??? अशा प्रकारे समजून घ्या
Airtel च्या ‘या’ 4 प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह मिळेल एका महिन्याची व्हॅलिडिटी !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन भाव तपासा