हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. यामध्ये कोकण विभागाने पहिला क्रमांक पटकावला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 90.91 टक्के लागला आहे.
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यानी आज 12वी च्या निकालाबाबत माहिती दिली. दरवर्षी प्रामाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा 95.35 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचं प्रमाण 93.29 टक्के आहे. याचाच अर्थ मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली पास झाल्या आहेत.
विभागानुसार निकाल –
कोकण – 97.22 टक्के
मुंबई – 90.91 टक्के
अमरावती – 96.34 टक्के
नागपूर – 96.52 टक्के
पुणे – 93.61 टक्के
कोल्हापूर – 95.07 टक्के
नाशिक – 95.03 टक्के
औरंगाबाद – 94.97 टक्के
लातूर – 95. 25 टक्के
निकाल कुठे पहावा-
विद्यार्थी आणि पालकांना निकाल पाहण्यासाठी maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in या संकेतस्थळांद्वारे पाहता येईल.