औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन हटवल्यानंतर हळूहळू सर्वात सुरू करण्यात आले. यामध्ये शहरातील नागरिकांना शहरांतर्गत प्रवासासाठी सिटी बस देखील सुरू करण्यात आल्या आहेत. आता यामध्ये अजून तेरा स्मार्टबस वाढवण्यात आलेल्या आहे. आता स्मार्ट सिटी बस विभागातर्फे नव्याने तेरा बस सुरू करण्यात येणार आहेत.
सोमवारपासून बारा मार्गावर या बस धावणार आहेत एकूण बत्तीस बसच्या विविध मार्गावर 444 फेऱ्या होणार आहेत. अशी माहिती स्मार्ट सिटी बस सेवेच्या वतीने देण्यात आली आहे. 8 जून पासून स्मार्ट सिटीची बस सेवा शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या बस सेवेला सहा मार्गावरील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रवाशांच्या मागणीनुसार दुसऱ्या टप्प्यातील बससेवाही सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून सुरू करण्यात आली. यामध्ये औरंगपुरा ते बजाज नगर, औरंगाबाद ते हिंदुस्तान आवास, बाबा पेट्रोल पंप ते चिकलठाणा, हर्सूल सावंगी ते नक्षत्रवाडी, सिडको ते रांजणगाव, मध्यवर्ती स्थानक ते करमाड, या बारा मार्गावर 444 फेऱ्या मार्फत 32 बस सेवा देतील.
बसचे निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे शिवाय प्रवाशांना कोरण्याची सर्व नियम समजावून सांगण्यात येईल असेही स्मार्ट सिटी बस विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच मास्क सॅनिटायझरचा उपयोग करणे बंधनकारक असणार आहे.