दोन्ही दाढीवाल्यांचं शटर बंद करायचं एवढंच आपलं लक्ष्य; नाना पटोलेंचा मोदी -शहांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे आहे. एवढंच आपल लक्ष्य आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. पुण्यात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

नकली दाढी वाढवलेल्या व्यक्तीने सांगितलं होतं, की मला ५० दिवस द्या. जर नोटबंदी फसली, तर मला कोणत्याही चौकात आपण द्याल ती शिक्षा हा प्रधानसेवक घेण्यास तयार आहे. मग आता त्याचं काय झालं?” असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

खोटं बोल, पण रेटून बोल, असे लोक सत्तेमध्ये आले असून मागील सात वर्षांत जी व्यवस्था काँग्रेस पक्षाने उभी केली होती. ती सध्याच्या केंद्रातील सत्ताधारी पक्षाने मोडकळीस आणली, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दाढीवाल्यांनी सामान्य लोकांना नोटबंदीवेळी लाईनमध्ये लावून मारलं. देशात तेव्हापासूनच महागाई वाढू लागली आहे. आता देशाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नसेल, असं नाना पोटोले म्हणालेत.

You might also like