सातारा जिल्ह्यात आजपासून 14 दिवस जमावबंदीचे आदेश

shekhar singh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्ह्यात आज दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत आहे. तसेच सज्जनगड येथे रामदास नवमी, स्वा. सावरकर पुण्यदिन, शंभू महादेवाचा महाशिवरात्री हा उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शस्त्र व जमावबंदी जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

कोविड विषाणुचा प्रादुर्भाव, विविध सण, उत्सव, समारंभ, यात्रा, पर्यटन क्षेत्र, धार्मिक स्थळे, लग्न, विविध आंदोलने या ठिकाणी जनसमुदाय एकत्र येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणुन जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37(1)(3) अनव्ये प्राप्त अधिकारास अधिन राहून संपूर्ण सातारा जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजीचे 00.00 वा. पासून ते दि. 4 मार्च 2022 चे 24.00 वा. पर्यंत शस्त्र बंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशामुळे पुन्हा नियमांचे व अटीचे पालन करून सण- उत्सव साजरे करावे लागणार आहेत. आज कोळे (ता. कराड) येथे होणारी बैलगाडी शर्यत त्यामुळे रद्द करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे भाविकांच्यातून व नागरिकांच्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे.