नवी दिल्ली | अर्थसंकल्पानंतर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता (DA) वाढवला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 14 टक्क्यांनी वाढ केली आहे.
मनीकंट्रोलच्या एका बातमीनुसार, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ही मोठी वाढ केल्यानंतर त्यांच्या पगारात बंपर जंप होणार आहे. कर्मचार्यांच्या पगारात 3 नव्हे तर थेट 14 टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. DA मधील ही वाढ फक्त केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSEs) कर्मचार्यांनाच मिळणार आहे. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा DA जानेवारीमध्ये रिवाइज करण्यात आला. यापूर्वी कर्मचाऱ्यांना 170.5 टक्के दराने DA मिळत होता, जो वाढवून 184.1 टक्के करण्यात आला आहे.
कोणत्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंडर सेक्रेटरी सॅम्युअल हक यांनी सांगितले की, CPSEs च्या बोर्ड लेव्हल आणि खालील बोर्ड लेव्हल ऑफिसर्सना याचा फायदा मिळेल. या लोकांच्या DA रिवाइज करण्यात आला आहे. आता या सर्व कर्मचाऱ्यांना 184.1 टक्के दराने DA मिळणार आहे.
DA ची थकबाकी मिळेल की नाही?
महागाई भत्त्याच्या (DA) थकबाकीबाबत मोदी सरकारकडून एक मोठे अपडेट आले आहे. 18 महिन्यांची DA ची थकबाकी देण्याबाबत कोणताही विचार करण्यात आला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत रोखलेला DA देण्याची मागणी केंद्रीय कर्मचारी सातत्याने करत होते. DA ची थकबाकी देण्याबाबत सरकार विचार करेल, अशी अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांना होती, मात्र याआधीही सरकारने अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे.