औरंगाबाद – महानगरपालिकेच्या सिध्दार्थ प्राणिसंग्रहालयातील सर्व १४ वाघ एक वर्षासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाने दत्तक घेतले. १४ वाघांसाठी १0 लाख रूपयांचा निधी धनादेशाच्या स्वरूपात बँकेच्या अधिकायांनी प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांकडे सुपूर्द केला आहे.
प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांसाठी मनपाने दत्तक योजना जाहीर केली होती. स्टेट बँक आॅफ इंडियाने या योजनेला प्रतिसाद देत प्राणिसंग्रहालयातील सर्वच्या सर्व १४ वाघ एक वर्षासाठी दत्तक घेतले. त्यात ३ पांढºया, तर ११ पिवळ्या वाघांचा समावेश आहे. प्राणिसंग्रहालयातील कार्यक्र मास खासदार इम्तियाज जलील, स्टेट बँक आॅफ इंडियाचे मुख्य विभागीय अधिकारी बलदेव प्रकाश, उपमहाव्यवस्थापक अलोककुमार चतुर्वेदी, रवीकुमार वर्मा, सहायक व्यवस्थापक दत्तप्रसाद पवार, प्रताप हंदराले आदी उपस्थित होते.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी नेमाणे व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी.एस. नाईकवाडे उपस्थित होते. डॉ. नाईकवाडे म्हणाले, बँकेने महापालिकेला १0 लाखांचा निधी दिला आहे. या निधीतून प्राणिसंग्रहालयात सोयी सुविधा देण्यात येणार आहे. तर विविध कामे येत्या काळात प्रशासनाकडून केली जाणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group