Thursday, March 30, 2023

सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांचाच – शरद पवारांचा गौप्यस्फोट

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचाच होता, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार सरकार स्थिर आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांमुळे राज्य सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. अनिल देशमुखांबद्दल निर्णय उद्यापर्यंत घेऊ, असेही शरद पवार म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group