कुत्रा चावल्यामुळे 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; वडिलांच्या कुशीत सोडले प्राण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका 14 वर्षीय मुलाचा रेबिजमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत मुलाला गेल्या दीड महिन्यांपूर्वी शेजाऱ्याचा कुत्रा चावला होता. मात्र भीतीमुळे त्याने ही गोष्ट आई-वडिलांपासून लपवून ठेवली होती. जवळपास एक महिन्यानंतर मुलगा विचित्र वागत असल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. यानंतर जेव्हा त्याची विचारना करण्यात आली त्यावेळी त्यांनी आपल्याला कुत्रा चावला असल्याची माहिती घरच्यांना दिली. पुढे मुलावर उपचार प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला रेबीज झाल्याचे आई वडिलांना सांगितले. मुलाच्या शरीरात रेबीजचे संक्रमण वाढल्यामुळे कोणत्याच रुग्णालयाने उपचारासाठी या मुलाला दाखल करून घेतले नाही. शेवटी 4 सप्टेंबर रोजी या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रेबीज झाल्यामुळे मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार, गाझियाबामध्ये राहणाऱ्या या चौदा वर्षीय मुलाचे नाव शहाबाज होते. शहाबाजला गेल्या दोन महिन्यापूर्वी शेजारच्या कुत्रा चावला होता. मात्र घरचे ओरडतील या भीतीने शहाबाजने आई-वडिलांना कुत्रा चावल्याची माहिती दिली नाही. परंतु एक महिन्यानंतर, मोठमोठ्याने ओरडणे, पाण्याला भिणे, अंधारातच राहणे अशी लक्षणे शहाबाजमध्ये दिसून लागली. एके दिवशी स्वतः शहाबाजने आपल्याला कुत्रा चावल्याची माहिती आई-वडिलांना दिली.

वडिलांच्या कुशीत जीव सोडला

यानंतर उपचारासाठी आई-वडील त्याला रुग्णालयात देखील घेऊन गेले. मात्र शहाबाजला रेबीज झाल्यामुळे आणि त्याचे संक्रमण वाढल्यामुळे कोणत्याच रुग्णालयाने त्याला दाखल करून घेतले नाही. रेबीज आजारावर उपचार होऊ शकत नसल्याची माहिती डॉक्टरांनी शहाबाजच्या आई-वडिलांना दिली. शेवटी आयुर्वेदिक उपचारांसाठी शाहबाजचे वडील त्याला बुलंदशहरात घेऊन गेले. मात्र गाझियाबादला परत येत असताना अँब्युलन्समध्येच शाहबाजचा मृत्यू झाला. शहाबाजने यावेळी वडिलांच्या कुशीत आपला जीव सोडला. शहाबाज ओरडत, रडत असताना देखील त्याचे वडील काही करू शकले नाही.

pic.twitter.com/AFdMH2DGyy

कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल

या सर्व घटनेनंतर पोलिसांनी शाहबाजच्या शेजारी राहणाऱ्या कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु कुत्र्याला लस देण्यात आली होती अशी माहिती कुत्र्याच्या मालकांनी पोलिसांना दिली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी आता कुत्र्याच्या मालकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. सध्या सोशल मीडियावर शहाबाज आणि त्याच्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये वडिलांच्या कुशीत शहाबाजने जीव सोडताना दिसत आहे.