पुणे हादरलं! सख्या भावाकडून 14 वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती राहिल्यावर प्रकरण उघडकीस

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरात एका सख्ख्या भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एकाच घरात राहणाऱ्या 24 वर्षाच्या भावाने आपल्याला 14 वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार केले. ज्यातून पिडीत मुलगी गर्भवती राहिली असून तिला आता एक बाळ झाले आहे. या प्रकरणानंतर पिढीत आईच्या मुलीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील वानवडी परिसरातून ही धक्कादायक घटना उघड केस आली आहे. पीडित मुलगी आपल्या आई, वडील आणि भावासोबत याठिकाणी राहत आहे. पिढीतेची आई धूनी भांड्याची काम करते तर वडील वॉचमनचे काम करतात. दिवसभर हे दोघे घरी नसल्यामुळे त्याचाच फायदा आरोपी भावाने घेतला. आई वडील दोघेही कामाला गेल्यानंतर पीडित मुलगीच घरी असल्यामुळे भावाने लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केले. गेल्या एका वर्षापासून हा सर्व प्रकार सुरू होता.

एकेदिवशी अचानक पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याची माहिती कुटुंबीयांना दिले. थोड्या वेळानंतरच पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला. या सर्व घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता 24 वर्षीय आरोपी भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. परंतु ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.