“व्हाट्सअप चॅनेल” फीचर नेमकं काय आहे? ते कोणाला सुरु करता येईल? वाचा सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतच व्हाट्सअपने आपल्या वापरकर्त्यांसाठी “व्हाट्सअप चॅनेल” नावाचा एक भन्नाट फीचर लॉन्च केला आहे. या फिचरच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे. या व्हाट्सअप फीचर्सचा फायदा व्यावसायिकांना ब्लॉग्स बनवणाऱ्यांना तसेच सेलिब्रिटींना जास्त प्रमाणात होणार आहे. परंतु इतर अनेकही फायदे या फीचर्सचे देण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या व्हाट्सअप चॅनल विषयीची सर्व माहिती.

व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल काय आहे?

व्हाट्सअपने आपल्या वापरकर्त्यांना दररोज घडणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती मिळावी यासाठी व्हाट्सअप चॅनेल सुरू केले आहे. जगात काय सुरू आहे काय घडत आहे याबाबतची सर्व माहिती या व्हाट्सअप चॅनलच्या माध्यमातून समजणार आहे. या व्हाट्सअप चॅनेलमध्ये आपण आपल्याला हव्या त्या चॅनलला फॉलो करून त्यांच्या अपडेट्स दररोज मिळू शकतो.

चॅनेल ॲडमीनची गोपनीयता

व्हाट्सअप चॅनेल हे फीचर वन डे कम्युनिकेशन आहे. आपण ज्या लोकांना फॉलो करू, त्यांच्याविषयीच्या सर्व अपडेट आपल्याला दररोज पाहायला मिळतील. परंतु आपल्याला व्हाट्सअप चॅनेलच्या ॲडमिनशी थेट संपर्क साधता येणार नाही. किंवा आपल्याला त्यांची कोणतीच खाजगी माहिती जाणून घेता येणार नाही. आपल्याला फक्त ते लोक सोशल मीडियावर कोणती माहिती टाकत आहेत हे जाणून घेता येईल. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला किंवा चॅनेलला शोधायचे असेल तर आपण कॅटेगिरी आणि नावाच्या मदतीने सर्च करू शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल सुरक्षित आहे का?

व्हाट्सअप चॅनेल हे व्हाट्सअप प्रमाणे सुरक्षित असणार आहे. या व्हाट्सअप चॅनलमध्ये चॅनलच्या ॲडमिनची सर्व माहिती गोपनीय असेल. तसेच आपण ज्या व्यक्तीला फॉलो करू त्याचा नंबर देखील आपल्याला दिसणार नाही. तसेच आपल्याला ऍडमिनशी थेट संपर्क साधता येणार नाही. इतकेच नव्हे तर, आपल्याविषयीची माहिती देखील एडमिनला दिसणार नाही. आपला नंबर आणि डिस्प्ले गोपनीय राहील. त्याचबरोबर, एडमिनकडून चॅनेलवर जे काही अपडेट्स दिले जातील ते तीस दिवसानंतर आपोआप डिलीट होतील.

व्हाट्सअप चॅनल कोणाला सुरू करता येईल?

सध्या प्रत्येकच व्यक्तीला हे चॅनल सुरू करता येणार नाही. मात्र हे फीचर सर्वसामान्यांना वापरता येऊ शकते. सध्या फक्त आपल्याला व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करता येत आहे. तसेच, चॅनलवरील लिखित मजकूर, फोटो, व्हिडीओ, स्टीकर्स, लिंक अशा गोष्टी देखील शेअर करता येतात.