हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : जर आज (मंगळवार, 23 ऑगस्ट) आपण ट्रेनने प्रवास करणार असाल तर घर सोडण्यापूर्वी एकदा आपल्या ट्रेनचे स्टेट्स जाणून घेणे महत्वाचे ठरेल. कारण आज रेल्वेकडून 123 गाड्या पूर्णपणे रद्द केल्या गेल्या आहेत तर 22 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 21 गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे तर 10 गाड्या अन्यत्र वळवण्यात आल्या आहेत. हे लक्षात घ्या कि, रद्द करण्यात आलेल्या या गाड्यांमध्ये पॅसेंजर, एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचा समावेश आहे.
अपघात, ट्रॅफिक ब्लॉक, खराब हवामान आणि दुरुस्ती या कारणांमुळे रेल्वेकडून गाड्या रद्द केल्या जातात. सोमवारी रात्री ओडिशात मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले. ज्यामुळे राजधानी एक्स्प्रेस, हिराखंड एक्स्प्रेस, जन शताब्दी, जुनागढ रोड एक्स्प्रेस, पुरी-दुर्ग, तपस्विनी, पुरी-गांधीधाम आणि पुरी-हावडा सारख्या अनेक गाड्या प्रभावित झाल्या आहेत. इतकेच नाही तर देशाच्या अनेक भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेला अनेक गाड्या रद्द कराव्या लागत आहेत. Train Cancelled
अशा प्रकारे जाणून घ्या स्टेट्स
हे जाणून घ्या कि, भारतीय रेल्वेच्या बहुतांश सेवा आता ऑनलाइन उपलब्ध जात आहेत. त्यामुळे, जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर घर सोडण्यापूर्वी एकदा आपल्या ट्रेनचे स्टेट्स जाणून घेणे महत्वाचे ठरेल. त्यासाठी रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes वेबसाइटवर किंवा IRCTC ची वेबसाइट https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/#list2 can वर जाऊन कोणत्याही ट्रेनचे स्टेट्स तपासता येईल.
रेल्वेच्या वेबसाइटद्वारे ट्रेनचे स्टेट्स कसे तपासावे हे समजून घ्या …
रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासण्यासाठी सर्वांत आधी http://enquiry.indianrail.gov.in/mntes/ वर भेट द्या.
यावर Exceptional Trains हा पर्याय दिसेल. तो निवडा.
रद्द, रिशेडयूल आणि डायव्हर्ट केलेल्या गाड्यांच्या लिस्टवर क्लिक करा.
येथे संपूर्ण माहिती मिळेल. Train Cancelled
ट्रेन रद्द झाल्यावर रिफंड देखील मिळतो
हे लक्षात घ्या कि, ज्या प्रवाशांनी IRCTC वेबसाइटद्वारे ई-तिकीट बुक केले आहेत त्यांना तिकिटांच्या रिफंडसाठी काहीही करण्याची गरज नाही. अशावेळी जर ट्रेन रद्द झाली तर रिफंड थेट ग्राहकाच्या बँक खात्यात/क्रेडिट कार्ड/ई-वॉलेटमध्ये जमा केला जाईल. जर रिझर्वेशन काउंटरवरून तिकीट खरेदी केले असेल, तर ते कोणत्याही कॉम्प्युटराइझ्ड रिझर्वेशन काउंटरवर जाऊन ट्रेन सुटल्यानंतर 72 तासांपर्यंत रद्द करता येईल. जर प्रवाशाने स्वतःहून तिकीट रद्द केले तर IRCTC कडून थोडा कॅन्सलेशन चार्ज रिफंड मधून कट केला जाईल. प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगिरीसाठीचा कॅन्सलेशन चार्ज वेगवेगळा आहे. Train Cancelled
हे पण वाचा :
Gold Price Today : जन्माष्टमीला सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे ताजे दर पहा !!!
Realme 9i 5G : 5,000 mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा..; Realme चा दमदार मोबाईल लॉन्च
Online Payment साठी कोणते App चांगले आहे ते जाणून घ्या !!!
PNB कडून ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत KYC करण्याचे आवाहन अन्यथा बंद होईल खाते !!!