कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कराड तालुक्याची आता कोरोनमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. आज तालुक्यात एकूण १५ कोरोनाबाधितांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला असुन दोन दिवसांपासुन कराड तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमधील 12 व कृष्णा हॉस्पिटल मधील 3 जण अशा एकूण15 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना आज रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला.
आत्तापर्यंत कराडमधुन एकूण 52 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर 1 जणाचा मृत्यू झाला आहे. कराड मध्ये आता 37 कोरोना अक्टिव रुग्ण असुन त्यांचेवर उपचार सुरु आहेत. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये सह्याद्रि हॉस्पिटलमधील वनवासमाचीतील 11 व खोडशीतील एक तर कृष्णा हॉस्पिटलमधून वनवासमाची, मलकापूर, कराड येथील प्रत्येकी एक रुग्ण कोरोना मुक्त झाला आहे. यामळे शुक्रवारी तालुक्यातील एकूण 15 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनामुक्त रुग्णांचे डॉक्टर्स, नर्स यांनी टाळ्या वाजवून पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये संचालक दिलीप चव्हाण, हॉस्पिटलचे कामकाज विभाग प्रमुख डॉ. वंकटेश मुळे, सहाय्यक व्यवस्थापक विश्वजित डुबल तर कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील यांच्यासह अन्य स्टाफ उपस्थित होता.
कर्हाड तालुक्यात आत्तापर्यंत 52 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये कृष्णा रूग्णालयातून 30, उपजिल्हा रूग्णालयातून 4 तर सह्याद्री रूग्णालयातून 18 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजपर्यंत महारूगडेवाडी, तांबवे, हजारमाची, बाबरमाची, चरेगाव, रेठरे बुद्रुक, कापील, कामेरी, कासेगाव, येतगाव, खोडशी, डेरवण, उंब्रज, मलकापूर आगाशिवनगर, वनवासमाची येथील रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या125 झाली असून या पैकी कोरोना मुक्त होवून घरी गेलेल्यांची संख्या ६० आहे. तर कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”