औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – सध्या आपण पाहू शकतो एकीकडे बेरोजगारी तर दुसरीकडे गुन्हेगारीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये अत्याचार असेल बलात्कार असेल किंवा चोरीच्या (Robbery) घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबाद मध्ये चोरीची (Robbery) घटना समोर आली आहे. यामध्ये चोरट्यांकडून तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
औरंगाबाद शहरातील पगारिया ऑटो(pagariya auto) हे सर्वात मोठे वाहन विक्रीचे शोरूम आहे. याच शोरूम मध्ये आंतरराज्यीय टोळीनी दरोडा (Robbery) टाकला. या टोळीने दरोडा (Robbery) टाकत 15 लाखांची रोकड लंपास केली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती.
या घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास सुरू करत चोरी (Robbery) करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखेने तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील चार लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. औरंगाबादच्या गुन्हे शाखेकडून हि कारवाई करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!