.. म्हणून १५० कोरोनामुक्त पोलिस पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा कड्यात अयोध्यत तैनात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अयोध्या । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अयोध्येमध्ये आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर उतरेल, त्यावेळी त्यांच्याभोवती विशेष सुरक्षाकडे असणार आहे. या सुरक्षा कड्यामध्ये कोरोनामुक्त झालेले स्थानिक पोलीस असतील, असे राज्याच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी मंगळवारी सांगितले. दैनिक लोकसत्त्ताने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

भूमिपूजन सोहळयाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी ३ तास अयोध्येमध्ये असतील. मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या या पोलिसांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. या पोलिसांमुळे करोनाचा फैलाव होणार नाही, असा प्रशासनाला विश्वास आहे. पुढचे काही महिने करोनाच्या धोक्यापासून पंतप्रधान मोदींचा बचाव करणे आवश्यक आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तंदुरुस्त सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे हा प्रोटोकॉलचा भाग आहे. सध्याच्या या दिवसांमध्ये करोना योद्ध्यांपेक्षा अधिक तंदुरुस्त कोण असू शकतात? असे यूपीचे पोलीस उपमहानिरीक्षक दीपक कुमार म्हणाले. करोनामुक्त झालेले हे १५० पोलीस सुरक्षेच्या पहिल्या स्तरामध्ये असतील. अयोध्येमध्ये करोनामुळे आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही ६०४ जण करोनाबाधित आहेत. “मी २९ जुलैला राज्याचे पोलीस महासंचालक हितेश चंद्र अवस्थी यांना पत्र लिहिले. कोरोनाची लागण होऊन त्यातून २५ जुलैपर्यंत बऱ्या झालेल्या १५० पोलिसांना अयोध्येला पाठवण्याची विशेष विनंती केली” असे दीपक कुमार यांनी सांगितले. बहुतांश पोलीस हे लखनऊचे असून काहीजण बरेलीचे आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”