कराड। जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे सातारा लोकसभा मतदार संघातील 26 रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक 3 अंतर्गत तब्बल 150 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुसंगाने सातारा, जावली, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव, वाई, कराड व पाटण या 8 तालुक्यातील रस्त्यांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती खा. श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातील विकासकामा संदर्भात खा. श्रीनिवास पाटील हे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यासाठी ते नेहमी संसदेत आवाज उठवत असतात तर कधी संबंधित मंत्री अथवा अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन विकासकामांबद्दल प्रयत्न करत असतात. राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत विकास संस्था मार्फत महाराष्ट्र राज्याकरिता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक 3 अंतर्गत सातारा जिल्ह्यात 300 किमीचे उद्दिष्ट मंजूर आहे. मात्र मागील तीन वर्षापासून सातारा जिल्ह्यात केवळ 6 किमीचे दोनच रस्ते झाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामे होत नसल्याची दखल घेऊन खा.पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या सातारा जिल्ह्यातील रस्त्यांचा मुद्दा अत्यंत तडफिने मांडून संबंधित रस्त्यांच्या कामाला तात्काळ चालना द्यावी अशी मागणी केली होती. याशिवाय केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्यासोबत प्रत्यक्ष झालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या आढावा बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित करून सदर कामांना लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच खा.श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिशा कमिटीच्या बैठकीत याविषयी आढावा घेऊन केंद्रीय ग्राम विकास मंत्री गिरीराज सिंग यांना पत्र लिहून याबाबत पाठपुरावा केला होता.
खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 26 रस्त्यांसाठी 150 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ते पुढीलप्रमाणे ः- सातारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 4 ते माजगाव आंबेवाडी मत्त्यापूर आतीत रस्ता सुधारणा करणे 4 कोटी 4 लक्ष, राज्य मार्ग 141 ते सातारा रेल्वे स्टेशन महागाव ते चिंचणेर निंब रस्ता सुधारणा करणे 2 कोटी 52 लक्ष, वनगळ ते आरफळ राज्य मार्ग 117 रस्ता सुधारणा करणे 4 कोटी 26 लक्ष 22 हजार
प्रजिमा 31 ते आष्टे झरेवाडी पोगरवाडी रंगुबाईचीवाडी गजवडी ते रायघर रस्ता सुधारणा करणे 4 कोटी 9 लक्ष 46 हजार राष्ट्रीय महामार्ग 4 वळसे देगाव ते जैतापूर रस्ता सुधारणा करणे 2 कोटी 64 लक्ष, वाई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 48 ते भुईंज (ओझर्डे) रस्ता सुधारणा करणे 3 कोटी 33 लक्ष 22 हजार, राष्ट्रीय महामार्ग 48 पाचवड ते चिंधवली, कारखाना ते भिवडी आर.एच.व्ही. ते कारखाना रस्ता सुधारणा करणे1 कोटी 89 लक्ष, राज्य मार्ग 119 ते कवठे ते राष्ट्रीय महामार्ग 48 रस्ता सुधारणा करणे 2 कोटी 94 लक्ष 34 हजार, जावली तालुक्यातील गणेशवाडी कापसेवाडी फाटा सरताळे म्हसवे ते शेते सुधारणा करणे रस्त्यासाठी 4 कोटी 74 लक्ष, खंडाळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 965डीडी ते मोरवे बिरोबावस्ती ते शेडगेवाडी रस्त्यासाठी 2 कोटी 66 लक्ष, प्रमुख जिल्हा मार्ग 3 वकाळ बोरी ते वेळेवाडी रस्त्याची सुधारणा करणे कामासाठी 2 कोटी 84 लक्ष, कोरेगाव तालुक्यातील कुमठे सांगवी चिमणगाव या रस्त्याची सुधारणा करणे कामासाठी 3 कोटी 28 लक्ष 79 हजार, कुमठे गोळेवाडी सुलतानवाडी एकसळ रस्ता सुधारणा करणे कामासाठी 3 कोटी 94 लक्ष 57 हजार, राष्ट्रीय महामार्ग 965 डी तळीये ते नलवडेवाडी रस्त्याची सुधारणा करणे 3 कोटी 28 लक्ष, राज्य मार्ग 142 तडवळे सं. कोरेगाव भोसे चिमणगाव रस्ता सुधारणा करणे 3 कोटी 4 लक्ष, महाबळेश्वर तालुक्यातील दानवली भिलार ते कासवण रस्त्याची सुधारणा करणे 3 कोटी 82 लक्ष, हारोशी ते राज्य मार्ग 139 ते जावली ते दरे रस्ता सुधारण करणे 3 कोटी 89 लक्ष 41 हजार, येर्णे बुद्रुक देवसरे सौंदरी कुरोशी ते लाखवड ते प्रतिमा 26 (गोगवे) रस्ता सुधारणा करणे 4 कोटी 77 लक्ष 82 हजार,
कराड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते गोटे मुंढे ते विजयनगर ते बिरोबा मंदिर ते विमानतळ हा रस्ता सुधारणा करणे 2 कोटी 53 लक्ष 87 हजार, कोडोली ते वडगाव हवेली ते गणेश नगर रस्त्याची सुधारणा करणे 4 कोटी 41 लक्ष 84 हजार, पाटण तालुक्यातील प्रजिमा 29 ते बोंदरी रस्ता सुधारणा करणे 3 कोटी 49 लक्ष, बेलवडे खुर्द सांगवड पापर्डे बुद्रुक रस्त्याची सुधारणा करणे 3 कोटी 25 लक्ष, प्रजिमा 58 ते दिवशी पापर्डे रस्ता सुधारणा करणे 3 कोटी 78 लक्ष, बांबवडे गायमुखवाडी ते कळंबे रस्ता सुधारणा करणे 4 कोटी 93 लक्ष 79 हजार, प्रतिमा 37 केळोली फाटा ते विरेवाडी केळोली रस्ता सुधारणा करणे 4 कोटी 73 लक्ष 7 हजार,सणबूर रूवले तामिने वाल्मिकी रस्ता सुधारणा करणे 4 कोटी ३८ लक्ष रूपये मंजूर झाले आहेत. हा निधी उपलब्ध झाल्यामुळे रस्त्यांचा विकास आणि रस्त्याचे मजबूतीकरण होण्याबरोबरच ग्रामीण भागात दळणवळण सहज सोपे होण्यास मदत मिळणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.