मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! सलग 5 दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबईची जीवन वाहिनी म्हणून लोकलची ओळख आहे. दररोज लाखो लोकलने प्रवास करतात. चाकरमान्यांचे जीवन हे लोकलवर अवलंबून आहे. मात्र मागच्या आठवड्यात झालेल्या पावसाळ्यापासून लोकलची सेवा थोडीशी खोळंबलेली पाहायला मिळत आहे. अशातच मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे बातमी आता समोर येत आहे. येत्या 4 ऑक्टोबर पर्यंत 150 लोकल रद्द होणार असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे . चला जाणून घेऊया.

पश्चिम रेल्वे वरील लोकल मधून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मालाड स्थानकापर्यंत सहाव्या लाईनच्या विस्ताराचं काम पश्चिम रेल्वे मार्फत हाती घेण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले. रेल्वे कडून या ठिकाणी मेजर ब्लॉक घेण्यात आला होता. त्यापैकी अजून 128 तासांचे काम बाकी आहे. म्हणूनच रेल्वेच्या माहितीनुसार चार ऑक्टोबर पर्यंत 150 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राम मंदिर स्टेशन ते मालाड दरम्यान 30 किलोमीटर प्रतितास वेगानं लोकल चालवल्या जाणार आहेत. याचा परिणाम दिवसभरातील वेळापत्रकावर होणार असल्याची माहिती आहे.

गोरेगाव फास्ट लोकल रद्द

माहितीनुसार मालाड स्थानकात ब्लॉगच्या वेळी कट अँड कनेक्शनचं काम झालेलं आहे. त्यामुळे मालाड स्थानकातील सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन हा प्लॅटफॉर्म क्रमांक चार म्हणून ओळखला जाईल. शिवाय सहाव्या लाईनचे काम जसं जसं पूर्ण होणार आहे तशी वेग वरील मर्यादा हटवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सकाळच्या वेळी पीक आवर्स मध्ये गोरेगाव वरून चार फास्ट लोकल चालवल्या जातात त्या चार लोकल मेजर ब्लॉकच्या काळात लूप लाईन उपलब्ध नसल्यामुळे बंद राहणार आहेत.

सहाव्या लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर मेल एक्सप्रेस साठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लोकलची संख्या वाढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे पश्चिम रेल्वेच्या नियोजनानुसार सहावी लाईन डिसेंबर 2024 पर्यंत बोरीवली पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे चर्चेत ते बोरिवली पर्यंत लोकल सेवेमध्ये सुधारणा होईल.

मेल आणि एक्स्प्रेस गाड्या 10 ते 20 मिनिटं उशिरा धावणार

पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली स्टेशन दरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सुरु आहे. रात्रीच्यावेळी या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे गोरेगाव अप आणि डाऊन फास्ट लाईन आणि मालाड अप आणि डाऊन फास्ट ट्रॅक आणि स्लो ट्रॅकवर घेतला जाईल. सोमवारी रात्री 12.30 वाजता ते मंगळवारी पहाटे 4.30 वाजतेपर्यंत म्हणजेच चार तासांचा ब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार या कालावधीत लोकल चर्चगेट ते अंधेरी आणि विरार ते बोरिवली पर्यंत चालवल्या जातील. या काळात मेल आणि एक्स्प्रेस गाड्या 10 ते 20 मिनिटं उशिरानं धावतील.