हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 आमदारांच्या बंडखोरी मुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. मात्र सरकार पाडण्यासाठी आम्ही 150 बैठका घेतल्या असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यांच्या या खुलाशाने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे बोलत असताना तानाजी सावंत म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे 180 पेक्षा जास्त उमेदवार निवडून आले. तेव्हा युतीत मिठाचा खडा टाकल्याशिवाय युती संपणार नाही हे शरद पवारांना कळाले. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी करू नका, यांच्या नादाला लागाल तर आत्मघात ठरेल असं उद्धव ठाकरेंना सांगणारा मी पाहिला आमदार होतो म्हणून मला मंत्रिमंडळात घेतलं नाही असा तानाजी सावंत यांनी म्हंटल.
2019 नंतर हे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व माझ्यात तब्बल 150 बैठका झाल्या. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांचे कॉन्सलिंग करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. हे सगळं मी लपून छपून करत नव्हतो तर उघडपणे करत होतो असेही तानाजी सावंत यांनी सांगितले. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी 2019 पासुनच सुरू झाली हे सिद्ध होतंय.