संतापजनक ! 16 वर्षाच्या मुलीवर सावत्र बापानेच केला लैंगिक अत्याचार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी ताडीवाला रोड येथील एका 11 वर्षाच्या मुलीवर बाप, भाऊ, आजोबा, चुलत मामा यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना आता सावत्र बापानेच मागच्या 4 वर्षापासून 16 वर्षाच्या मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे.

हि धक्कादायक घटना वडगाव शेरी व वाघोली येथील दोन सोसायटींमध्ये 2016 ते 2018 दरम्यान आणि 2019 ते 2020 दरम्यान घडली आहे. या प्रकरणी एका 16 वर्षाच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 32 वर्षीय सावत्र बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी हा फिर्यादी मुलीचा सावत्र बाप आहे. फिर्यादी मुलगी घरात एकटी असताना त्याने मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. वडगाव शेरी आणि वाघोली येथील सोसायटीमध्ये राहत असताना हि धक्कादायक घटना घडली होती. यानंतर हा आरोपी सावत्र बाप आसामला निघून गेल्यानंतर पीडित मुलीने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेऊन आरोपी नराधम बापाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.