औरंगाबाद : गुन्हे शाखेने ठिकठिकाणी छापे करून शहरातील १६ हजार रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. अवैध दारू विक्रेत्यांविरोधात गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. एकाच दिवसात पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत १५ हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली असून यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या हद्दीतील आहेत.
शहरातील सर्वाधिक अवैध देशी दारू विक्रते वाळूज एमआयडीसी पोलीस हद्दीतील आहेत. या हद्दीत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे मारले असता एकाच दिवसात सहा ठिकाणचे अवैधरित्या दारू विक्रेत्यांचे अड्यांवर छापे मारून अड्डे उदवस्त केले आहे. पंढरपूर येथील भाजीमांडीजवळ अशोक थोरात यांच्याकडून १ हजार ३८० रुपयांची तर याच्या कडून आकाश मुनेकडून २ हजार ५२० रुपयांचा दारूसाठा पोलिसांकडून हस्तगत करण्यात आला आहे. यात महिलांचा देखील समावेश होता रांजणगाव येथील दोन महिलांच्या ताब्यातून ५ हजार ७९० रुपयांची दारूसाठा जप्त झाला आहे.
राजेंद्र गडकरी जोगेश्वरी यांच्या कडून १ हजार ३२० रुपयांची दारू तर रांजणगाव येथील सागर वाघमारेकडून १ हजार १४० रुपयांची दारू जप्त केली. तसेच पुढील सिडको व पुंडलिकनगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन महिलांकडून अनुक्रमे १ हजार २०० व १ हजार १४० रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांना मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सचिन खरात हा अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १ हजार ५६० रुपयांची देशी दारू जप्त केली आहे.