हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन 17 New Gram Panchayat In Maharashtra । महाराष्ट्रात १७ नवीन ग्रामपंचायती निर्माण होणार आहेत. राज्य शासनाच्या ग्रामपंचायत व पंचायत राज विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील काही ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या नवीन ग्रामपंचायतीच्या निर्मितीमुळे आता महाराष्ट्रातील एकूण ग्रामपंचायतीची संख्या २७ हजार ९६८ इतकी झाली आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे संबंधित गावे विकासाच्या प्रवाहात येतील अशी आशा जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २४३ (खंड छ) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ४ नुसार या नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती (17 New Gram Panchayat In Maharashtra) करण्यात आली आहे. नव्याने स्थापन आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये पुणे विभागातील सात, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील सहा, कोकण व नागपूर विभागातील प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या नव्या ग्रामपंचायतींमुळे या सर्व गावांच्या विकासाला आता गती मिळेल आणि सर्व गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील असे मत जयकुमार गोरे यांनी मांडलं.
कोणकोणत्या नव्या ग्रामपंचायतीचा समावेश? 17 New Gram Panchayat In Maharashtra
पुणे – ढाकाळे व खामगळवाडी (बारामती तालुका), एडगाव व भोरवाडी (जुन्नर तालुका), गार, बेटचीवाडी, मवीनगार (दौंड)
छत्रपती संभाजीनगर – निंबायती व रामपुरा ( सोयगाव )
रत्नागिरी – चिंद्रवली व उमरे ( रत्नागिरी तालुका)
जालना – पाथरवाला बुद्रुक व कुरण ( अंबड ) हिवराराळा व हनुमान नगर (बदनापूर)
नागपूर – पोटा व चनकापूर (सावनेर)
नव्या ग्रामपंचायतीचे फायदे काय ?
नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे गावाचा विकास होतो, स्थानिक समस्यांवर तातडीने तोडगा काढता येतो, लोकांच्या सहभागाला वाव मिळतो. सरकारी योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना घेता येतो. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते.




