उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्याच्या दिबियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली (naked dead body found) आहे. या ठिकाणी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र मृतदेह (naked dead body found) आढळून आला. या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मुतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
यूपी के औरैया में एक 17 साल की लड़की का निर्वस्त्र शव खेत में मिला।
पुलिस पहुंची और शव को आनन-फानन में लेकर भागने लगी। बदहाल परिवार पीछे दौड़ रहा है।
महिलाओं के खिलाफ अपराध के मामले में 'यूपी नंबर 1' है।
लेकिन कोई 'जंगलराज' नहीं कहेगा… pic.twitter.com/2m8ok7OrTj
— Congress (@INCIndia) October 3, 2022
यादरम्यान या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 17 वर्षीय मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह (naked dead body found) आढळल्यानंतर, पोलीस पथक तरुणीचा मृतदेह घटनास्थळावरून घेऊन जाताना दिसत आहेत. तसेच या मुलीच्या कुटुंबातील लोक या पोलिसांच्या मागे पळताना दिसत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
हि घटना उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्याच्या दिबियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये घडली आहे. या ठिकाणच्या एका शेतकऱ्याची मुलगी सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गावाबाहेरील शेतात शौच करण्यासाठी गेली. मात्र ती माघारी परतलीच नाही. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेच भेटली नाही. यादरम्यान घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर बाजरीच्या शेतात मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत (naked dead body found) आढळून आला. तिच्या गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळला होता. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय