नवी दिल्ली । ज्या करदात्यांनी अजूनही 2019-20 या आर्थिक वर्षासाठी त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न ई-व्हेरीफाईड केले नाही ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत व्हेरीफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना दिलासा देत ई-व्हेरिफाइडची मुदत वाढवली आहे.
कायद्यानुसार, डिजिटल सिग्नेचरशिवाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी, आधार OTP, नेट-बँकिंग, डिमॅट अकाउंटद्वारे पाठवलेला कोड, आधीच व्हॅलिडेट केलेले बँक खाते किंवा ATM द्वारे व्हेरिफाय करावे लागते. हे व्हेरिफिकेशन रिटर्न भरल्यानंतर 120 दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. यानंतर दाखल केल्यास दंड आकारला जाईल.
फिजिकल कॉपी देखील पाठविली जाऊ शकते
याशिवाय, करदाते ITR ची फिजिकल कॉपी बेंगळुरूमधील सेंट्रलाइज़्ड प्रोसेसिंस सेंटर (CPC) ऑफिसमध्ये पाठवून देखील व्हेरिफाय करू शकतात. जर व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर रिटर्न भरले गेले नाही असे मानले जाते.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 28 डिसेंबर रोजी जारी केलेल्या सर्कुलरमध्ये असे म्हटले गेले आहे की, मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दाखल केलेले ITR अजूनही प्रलंबित आहेत कारण कि त्यांच्यासाठी व्हॅलिड ITR-V म्हणून सर्कुलरकडे पावती मिळालेली नाही किंवा करदात्यांनी ई-व्हेरिफिकेशन केलेले नाही.