धक्कादायक ! अमेझॉनवरून विष मागवून 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इंदूर : वृत्तसंस्था – अमेझॉन कंपनीवरून विष ऑर्डर करून 18 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याच्या मृत्यूनंतर आईवडिलांनी त्याचा मोबाईल चेक केला असता त्यांच्या लक्षात हि गोष्ट आली. यानंतर ऑनलाईन विष विकण्यावर आईवडिलांनी आक्षेप घेतला आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या 18 वर्षांच्या आदित्य वर्मानं अमेझॉनवरून विष मागवल्याचं समोर आले आहे. 20 जुलै रोजी पहिल्यांदा त्यानं अमेझॉनवरून विष ऑर्डर केलं. मात्र पुढच्या दोन दिवसात पेमेंट न झाल्यामुळे ती ऑर्डर कॅन्सल करण्यात आली. त्यानंतर 28 जुलै रोजी त्यानं पुन्हा एकदा अमेझॉनवरून सल्फास नावाचं विष मागवलं.

यानंतर 29 जुलै रोजी आदित्य हे विष पिऊन झोपी गेला. यानंतर त्याची तब्येत बिघडल्याचे लक्षात येताच त्याच्या आईवडिलांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. 30 जुलै रोजी डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केले. या घटनेचा त्याच्या आईवडिलांना जबर धक्का बसला आहे. आदित्यचे आईवडील फळ विक्रीचं काम करतात. आदित्यही फळांचा गाडा लावून त्यांना व्यवसायात मदत करत होता. मात्र त्याने अचानक आत्महत्येचं पाऊल का उचललं, याबाबत कुठलीही कल्पना त्याच्या आईवडिलांना नव्हती.

या घटनेनंतर काही दिवसांनी आदित्यच्या आईवडिलांनी त्याचा मोबाईल चेक केला असता त्यांना आदित्यला झालेल्या विषबाधेचं रहस्य समजलं. त्याने अमेझॉनवरून केलेल्या ऑर्डरचे तपशील त्यांना मिळाले आणि त्यांनी कंपनीविरोधात तक्रार करायचं ठरवलं. यानंतर आदित्यच्या आईवडिलांनी अमेझॉन कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. कंपनीनं जीवनावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थ पुरवायला हरकत नाही, मात्र अशा प्रकारे विष किंवा चिनी हत्यारं पुरवणं हे अत्यंत आक्षेपार्ह आहे असे म्हणत त्यांनी कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

Leave a Comment