अफगाणिस्तानच्या पंजशीरवर संपूर्ण जगाचे लक्ष का आहे? तालिबानला इशारा देणारा अहमद मसूद कोण आहे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सध्या संपूर्ण जगाचे लक्ष अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यावर आहेत. येथे अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूदने तालिबान्यांना हुसकावून लावण्यासाठी आपले सैन्य तयार करण्यास सुरुवात केली आहे. अहमद, जो भारतातील चंदीगड येथून शिकला आणि मूळचा पंजशीरचा आहे, तो सध्या तेथे उपस्थित आहे. तो पंजशीर खोऱ्याच्या जंगल परिसरात आहे आणि इथेच अहमद मसूदने तळ ठोकला आहे.

अहमदने एका न्यूज चॅनेलला सांगितले की,” मसूद जंगलेकमधील लोकांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहे जेणेकरून तालिबानला अफगाणिस्तानातून हाकलून लावता येईल. सध्या अमेरिकन सैन्य आणि पोलिसांसोबत काम केलेले सुमारे 20 हजार सैनिक जंगलेकमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी त्यांची शस्त्रे आणि वाहनेही सोबत आणली आहेत.

याशिवाय, तालिबानशी आधीच लढलेले सुमारे 15,000 सैनिकही मसूदसोबत आले आहेत. मसूदने तालिबानला इशारा दिला आहे की,”अफगाणिस्तान सरकारमध्ये प्रत्येकाचे प्रतिनिधित्व असले पाहिजे अन्यथा तालिबान सरकार स्वीकारले जाणार नाही. अफगाणिस्तान तालिबान मुक्त करण्यासाठी मसूदने आपली तयारी सुरू केली आहे.

तालिबानचे जुने रेकॉर्ड पाहता असे दिसते की, मसूदची नॉर्दर्न अलायंस आणि तालिबान यांच्यात एकाहून अधिक युद्धे होऊ शकतात. पंजशीर हे अफगाणिस्तानमधील एक क्षेत्र आहे जे तालिबान कधीच काबीज करू शकलेला नाही. मसूदचे वडील अहमद शाह मसूद यांना पंजशीरचे शेर असे संबोधले जात असे आणि त्याला आजही अफगाण जमातींमध्ये आदराचे स्थान आहे.

2001 मध्ये अहमद शाह मसूदची अल-कायदा आणि तालिबानने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात हत्या झाली. आता त्याचा मुलगा नवीन तालिबानचा पुन्हा एकदा पंजाशिरमधून सामना करण्यासाठी तयारी करत आहे. यासाठी त्याने अफगाणिस्तानच्या मित्र देशांकडून मदतीचे आवाहनही केले आहे.

Leave a Comment