Friday, June 9, 2023

पिकनिक पडली महागात! दीड हजार फुट उंचावरून पाय घसरून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये गुजरातवरुन पिकनिकला आलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तक्षिल संजाभाई प्रजापती असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. यामध्ये तब्बल दीड हजार फुट उंच असलेल्या धबधब्यावरुन (waterfall) खाली कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुट्टीच्या निमित्ताने मृत क्षिलसह त्यांचे दहा-बारा मित्र नाशिकच्या सुरगाणा येथे एका रिसॉर्टवर आले होते. यावेळी जवळच गरम पाण्याचा धबधबा (waterfall) असल्याने तक्षिलसह त्याचे मित्र गरम पाण्याच्या झऱ्याखाली आनंद लुटत होते. त्यावेळी झऱ्याखाली असलेल्या खडकावर शेवाळ आले आणि त्यावरून तक्षिलचा पाय घसरला आणि तो दीड हजार उंचीवरून खाली पडला.

नाशिकच्या सुरगाणा येथे साखळचोंड धबधबा (waterfall) प्रसिद्ध आहे. त्याच ठिकाणी गुजरातचे काही विद्यार्थी पिकनिक साठी आले होते. पिकनिकला आलेल्या तरुणांनी गरम पाण्याच्या झरा असल्याने आंघोळ करण्यास सुरुवात केली होती. यावेळी सगळे गरम पाण्याच्या झऱ्याखाली आंघोळ करत होते. यादरम्यान अचानक क्षिलचा पाय शेवाळ असल्याने खडकावरून घसरला आणि दीड हजार खोल दरीत कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर घटनास्थळाचा (waterfall) पंचनामा करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच तक्षिलचे नातेवाईक गुजरावरून नाशिकमध्ये दाखल झाले होते. यानंतर पोलीसांनी खात्री करून तक्षिलचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?