‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – साऊथ सुपरहिट चित्रपट ‘कांतारा’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाल्याने त्याला अजून रिस्पॉन्स मिळत आहे. तसेच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात ‘भूत कोला’ ही परंपरा दाखवण्यात आली आहे. यासंदर्भात चित्रपटातील कन्नड अभिनेता चेतन अहिंसा (Chetan ahimsa) याने सोशल मिडियावर एक पोस्ट करत, ‘भूत कोला’ परंपरा हिंदू धर्माचा भाग नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या (Chetan ahimsa) या वक्तव्याने अनेक हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.

हिंदूंच्या भावना दुखावल्या
अभिनेता चेतन (Chetan ahimsa) याने केलेल्या वक्तव्यावरून कर्नाटकातील हिंदूंच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळे हिंदू जागरण वेदिकेने उडुप्पी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात अभिनेता चेतन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलीसांनी अभिनेता चेतन अहिंसा याला पोलिस ठाण्यात बोलावून वक्तव्य न करण्याचे आवाहान केले.

चेतन अंहिसाने पोस्टमध्ये काय लिहिले?
भूत कोलाची परंपरा ही हिंदू धर्माचा भाग नाही आणि ती हिंदू धर्म अस्तित्वात येण्याच्या आधीही होती. ज्याप्रमाणे हिंदू भाषा लादता येत नाही, त्याचप्रमाणे हिंदुत्व लोकांवर लादता येत नाही, असेही त्याने म्हटले आहे. भूत कोला ही देशातील मूळ रहिवाशांची परंपरा आहे. ही फक्त हिंदू धर्मातच येणार नसल्याचेही त्याने म्हटले आहे. त्याच्या (Chetan ahimsa) याच व्यक्तव्यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती