नागपूर । साधारणपणे आपण जास्तीत जास्त 30 ते 40 डब्यांची मालगाडी धावलेली पाहिली असेल. मात्र भारतीय रेल्वेने तब्बल 2.8 किलोमीटर लांबीची आणि तब्बल 251 डबे असलेली एक ट्रेन चालवण्याचा विक्रम केला आहे. ‘शेषनाग’ असे नाव या विशेष मालगाडीला देण्यात आले होते. छत्तीसगडमधील परमलकसा आणि दुर्ग या २ स्टेशन दरम्यान ही ट्रेन चालवण्यात आली.
परमलकसा आणि दुर्ग हे दोन्ही स्टेशन रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य झोनच्या नागपूर विभागात येत असले तरी छत्तीसगडमधील स्टेशन्स आहेत. यासाठी रेल्वेने ४ मालगाड्या एकत्र जोडल्या होत्या. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. तर या ट्रेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
शेषनाग Running on Track: Boosting freight transportation, Railways has run 251 wagons with 4 trains combined together, totalling to 2.8 km, between Nagpur & Korba. pic.twitter.com/UYrau3pfbi
— Piyush Goyal (@PiyushGoyal) July 2, 2020
अशी धावली ‘शेषनाग’ ट्रेन
251 डबे, व्हॅगन, 4 ब्रेक व्हॅन आणि 9 विद्युत लोको (इंजिन ) या खास ‘शेषनाग’ ट्रेनला जोडण्यात आले होते. मालगाडीने परमलकसा ते दुर्ग दरम्यानचे 22 किलोमीटरचे अंतर 45 मिनिटात पूर्ण केले. परमलकसा येथून ही ट्रेन काल दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सोडण्यात आली. ती 1 वाजून 5 मिनिटांनी दुर्गला पोहोचली. ही मालगाडी दुर्गहून पुढे बिलासपूर आणि तेथून कोरबापर्यंत ही गेली. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच ४ मालगाड्यांना जोडून एवढी लांब मालगाडी तयार करत ती चालवण्यात आली आहे. अशा प्रयोगामुळे भविष्यात एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत सामग्री, अन्न धान्य, युद्ध जन्य परिस्थितीत आवश्यक साहित्य पोहोचवण्यासाठी रेल्वे काय करू शकते याची चाचपणी झाली आहे.
रेलवे द्वारा देश में रेकार्ड 2.8 किमी लंबी मालगाड़ी का सफलतापूर्वक परिचालन किया गया। 4 ट्रेनों को जोड़कर शेषनाग नाम से मालगाड़ी चलाने का यह प्रयोग सफल रहा।
इससे एक बार में अधिक सामान को एक स्थान से दूसरे स्थान पर भेजा जा सकता है। pic.twitter.com/FgQocG00La
— Piyush Goyal (@PiyushGoyal) July 2, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”