मोबाईलवरून शोध : सांगली जिल्ह्यात शेततळ्यात पडून 2 बालकांचा दुर्देवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | तासगांव तालुक्यातील आरवडे येथे घराच्या मागे असणाऱ्या शेततळ्यात पडून शौर्य संजय मस्के (वय-6 वर्षे, रा.आरवडे ता.तासगाव) व ऐश्वर्या आप्पासो आवटी (वय-8 वर्षे, रा.माधवनगर) या दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरवडे- गोटेवाडी रोडलगत असणाऱ्या मस्के वस्ती येथे आपल्या घराबाहेर शौर्य व ऐश्वर्या नेहमीप्रमाणे खेळत होती. सायंकाळी 3 च्या दरम्यान दोघेही दिसेनात म्हणून कुटुंबीयांनी आसपासच्या घरामध्ये शोधायला सुरवात केली.मात्र ते दोघे सापडले नाहीत.
त्यानंतर घरामागे असणाऱ्या शेततळ्याकडे शोधायला गेले असता शेततळ्यावर मोबाईल दिसला. पाण्यामध्ये घसरून पडल्याचा अंदाज व्यक्त करत तरुणांनी पाण्यात उड्या टाकल्या असता शेततळ्याच्या तळभागात दोघे सापडले. तात्काळ त्यांना पाण्याबाहेर काढून तासगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.यापैकी ऐश्वर्या ही माधवनगर येथील नातेवाईकांच्या घरातून आरवडे येथे काही दिवसांपूर्वी आली होती.घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणार होता. शौर्य हा आईवडिलांना एकुलता एक होता तर ऐश्वर्या हिला 2 लहान भाऊ आहेत.

मोबाईल वरून अंदाज आला

दोन्ही बालकांचा शोध आसपासच्या घरामध्ये घेऊन सुद्धा सापडत नव्हती.त्यामुळे ती कोठे गेली असतील याची चिंता वाटत होती.कुटुंबातील सदस्य यांनी याबाबत शेततळ्याकडे जाऊन शोध घेतला असता तळ्यावर मोबाईल दिसला त्यानंतर पाण्यात उड्या टाकून दोघांना बाहेर काढले.पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

आरोग्य विभागाची सतर्कता

घडलेल्या घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक धक्का बसला होता. अनेकांना त्रास होत होता. आरोग्य विभागाचे डॉ.रोहित जाधव,गणेश करांडे, या घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत थांबून उपचार करीत होते. तर सतर्कता म्हणून 108 अंबुलन्स व 102 अंबुलन्स घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या होत्या.

Leave a Comment