सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षी सांगणाऱ्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला अफजल खानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले. हे अतिक्रमण हटवल्यानंतर या ठिकाणी अफजल खान कबरीसोबत सय्यद बंडा आणि अजून 2 कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी नेमक्या कोणाच्या? त्या कधी बांधण्यात आल्या? याचे काही पुरावे आहेत का? याचे गूढ वाढले आहे.
अफजल खान कबरीसोबत सय्यद बंडा आणि अजून 2 कबरी आढळून आल्या लेणे ग्रामस्थांकडूनही काही गोष्टी सांगितल्या जात आहेत. स्थानिक ग्रामस्थ असलेले अप्पा उत्तेकर यांनी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, प्रशासनाने जे काही अनधिकृत बांधकाम होते ते काढले ती चांगली गोष्ट आहे. खूप वर्षांपासून अतिक्रमणाचे हे घोंगडे भिजत पडलेले.
अतिक्रमण काढताना ज्या दोन कबरी आढळून आलेल्या आहेत. त्या कोणाच्या आहेत याबाबत माहिती मळणे गरजेचे आहे. अफजल खानाच्या भक्तांकडून या याठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उरूस केला जात होता. खूप वर्षांपासून याचे उदात्तीकरण चालले होते. हे प्रशासनाने थांबवली हि चांगलीच गोष्ट आहे. प्रशासनने ज्या काही कबरी शोधून काढल्या आहेत त्या शालेय विध्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुल्या कराव्यात.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/655800179469193
प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत जिल्हाधिकारी रुचेल जयवंशी यांनीही माहिती दिली. ते म्हणाले की, अफजलखानाच्या कबरी जवळ एकाच खोलीत आणखी दोन कबीर सापडल्या आहेत. एक कबर सय्यद बंडाची असल्याचे सांगितले जात आहे. अन्य दोन कबरी अनोळखी असून त्या कोणी आणि कधी बांधल्या याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या कबरीचे कुठलेही प्रकारचे नुकसान न करता अनाधिकृत बांधकाम हटवण्यात आले असल्याचे जयवंशी यांनी सांगितले.
आढळलेल्या कबरीबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असणाऱ्या अफजल खान कबरीच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण सातारा जिल्हा प्रशासनाने मोठा फौज फाटा लावून पाडले. तब्बल 22 तास हे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू होती. हे अतिक्रमण काढल्यानंतर मात्र अजून 3 कबरी या ठिकाणी असल्याचे दिसून आले आहे.
अफजल खान कबरी शेजारी सय्यद बंडा यांची कबर, सेवेकाऱ्याची कबर आणि एक कबर सैनिकांची असल्याचे स्थानिक सांगताहेत. तर अतिक्रमणात पाडण्यात आलेल्या एका खोलीत एक कबर सापडली आहे. ही काही वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही कबर शिवकालीन नाही मग ही कबर नेमकी आहे तरी कोणाची आणि ही कधी बांधण्यात आली यांची माहिती प्रशासन घेते आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला या कबरीच्या आजूबाजूला असलेले जे अतिक्रमण काढले आहे त्याचा अहवाल मागितला आहे. हा अहवाल देते वेळी प्रशासनाला या दोन नव्याने सापडलेल्या कबरी बाबत सुद्धा माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.