सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुणे- बंगलोर महामार्गावर सातारा जिल्ह्यातील नागठाणे वेगनार गाडीने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. मंगळवारी दि. 3 रोजी पहाटे 6 वाजण्यच्या सुमारास झालेल्या या अपघातात पती- पत्नी ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या लेनवरती हा अपघात झाला असून वेगनार गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून व बोरगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सातारा- कराड दरम्यान असलेल्या नागठाणे गावच्या चौकात पहाटे 6 च्या सुमारास वेगेनार गाडी (MH-06-CD-1724) ने थांबलेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. यामध्ये नाना साळुंखे (वय -69), लक्ष्मी साळुंखे (वय- 62) असे ठार झालेल्यांची पती- पत्नी नावे आहेत. तर माधुरी साळुंखे (वय – 25), मछिंद्र जाधव (वय- 40), तनुजा जाधव (वय- 35), कनुष्क जाधव (वय- 4) अशी जखमींची नांवे आहेत.
पहाटे झालेल्या या अपघातामुळे मोठा गोंधळ उडाला. माॅर्निंग वाॅकला आलेल्या लोकांनी अपघातातील जखमींना मदत केली. वेगनार गाडीचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी सातारा व कराड येथे दाखल केले. अपघातात जखमी व ठार झालेले असलेले पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील असल्याची माहिती समोर येत असून सध्या हे ठाणे येथे राहण्यास आहेत.