गेल्या काही वर्षांत ‘या’ 2 Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारातील काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना दीर्घकालावधीत मोठा नफा मिळवून दिला आहे. श्री सिमेंट आणि सेरा सॅनिटरीवेअरच्या शेअर्सने देखील आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. श्री सिमेंटच्या शेअर्सने अवघ्या 21 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे 770 पटीने वाढवले ​​आहेत. त्याचप्रमाणे सेरा सॅनिटरीवेअरच्या शेअर्सने 15 वर्षात 1 लाख गुंतवणाऱ्या गुंतवणूकदाराला करोडपती बनवले आहे. Multibagger Stock

This multibagger stock nearly tripled shareholder's money in 1 year; do you own it? - BusinessToday

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, NSE वर 6 जुलै 2001 रोजी श्री सिमेंटच्या शेअर्सची किंमत फक्त 30.30 पैसे होती. 7 सप्टेंबर रोजी हा शेअर 8.43 टक्क्यांच्या उसळीसह 23,480 रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे, श्री सिमेंटच्या शेअर्समध्ये जुलै 2001 पासून सुमारे 77,391.75 टक्के वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात श्री सिमेंटच्या शेअर्समध्ये 10.78% वाढ झाली आहे. मात्र, गेले वर्षभर हे शेअर्स दबावात असून 23.75 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या 5 वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 25.30 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

6 जुलै 2001 रोजी जर एखाद्याने यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला सुमारे 7.75 कोटी रुपये मिळाले असते. इतकेच नाही तर 2001 मध्ये एखाद्याने यामध्ये 13,000 रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या गुंतवणुकीचे रूपांतर 1 कोटी 73 रुपये झाले असते. Multibagger Stock

Watch out for the risks to your money- The New Indian Express

मिडकॅप स्टॉक असलेल्या सेरा सॅनिटरीवेअरचे शेअर्स बुधवारी 4.19% वाढीसह 5560 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 17.81% वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2007 मध्ये सेरा सॅनिटरीवेअरचे शेअर्स 70.75 रुपयांवर ट्रेड करत होते. त्याच वेळी, त्यांची किंमत आता 5560 रुपयांवर पोहोचली आहे. जर 2007 मध्ये एखाद्याने यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य 1.57 कोटी रुपये झाले असते. गेल्या 15 वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे वाटपही केले आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://2 multibagger stocks, raining money on long term investors

हे पण वाचा :

रिटायरमेंटनंतरच्या Pension साठी NPS की PPF मधील कोणता पर्याय योग्य ठरेल ते जाणून घ्या

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचा भाव पहा

Apple iPhone 14 : iPhone 14 सीरीजची धमाकेदार एंट्री; शानदार फीचर्ससह कंपनीने लॉन्च केले 4 मोबाईल्स

LIC ने लाँच केला नवीन पेन्शन प्लस प्लॅन, त्याविषयी जाणून घ्या

Home : बुकिंग रद्द केल्यास घर खरेदीदारांना होणार नाही जास्त नुकसान, RERA ने बिल्डर्सना दिले ‘हे’ आदेश