रिटायरमेंटनंतरच्या Pension साठी NPS की PPF मधील कोणता पर्याय योग्य ठरेल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंटनंतर Pension मिळवण्यासाठी अनेक लोकं प्रयत्नशील असतात. वृद्धापकाळासाठी तो एक मोठा आधारही ठरतो. रिटायरमेंटनंतर चांगला पेन्शन फंड जमा करता यावा यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. तर आज आपण अशा 2 पेन्‍शन प्लॅन्सबाबत जाणून घेणार आहोत आणि यापैकी कोणती योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल ते पाहूयात…

Employee Pension Scheme - IndiaFilings

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) अशा या योजनेची नावे आहेत. हे लक्षात घ्या कि, NPS एक मार्केट लिंक्ड स्कीम आहे. ज्यामध्ये मिळणार रिटर्न हा फंड मॅनेजरच्या कामगिरीवर अवलंबून असतो. तर दुसरीकडे, PPF अशी योजना आहे ज्यामध्ये निश्चित रिटर्न मिळतो. चला तर मग त्याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात…

National Pension Scheme : రూల్స్‌ మారాయ్‌..సడలించిన నిబంధనలు ఇవే | Sakshi Education

NPS

वर सांगितल्या प्रमाणे NPS ही एक मार्केट लिंक्ड स्कीम असल्याने त्यामध्ये जोखीमही जास्त आहे. यामध्ये आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करता येईल. यासाठी आपल्याकडे तीन पर्याय आहेत. यातील पहिल्या पर्यायामध्ये 75% रक्कम इक्विटीमध्ये गुंतवता येईल. तर दुसऱ्या पर्यायामध्ये 100% पैसे कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवू शकता. तसेच तिसऱ्या पर्यायामध्ये सरकारी बॉण्ड्स खरेदी करता येईल. यामध्ये मिळणार रिटर्न हा आपले पॅसीए कुठे गुंतवले जात आहेत यावर अवलंबून असेल. NPS मध्ये गुंतवणूक करण्यासाठीचे शेवटचे वय 50 वर्षे आहे. त्याच वेळी, त्याची मॅच्युरिटी वयाच्या 60 व्या वर्षी असेल. तसेच मॅच्युरिटी नंतर काही रक्कम एकरकमी दिली जाईल तर बाकीच्या रकमेतून पेन्शन मिळेल. तसेच या योजनांमध्ये जास्तीत जास्त 3 वेळा सशर्त पैसे काढता येतील. Pension

PPF Calculator: Want Rs 1 Crore Guaranteed Income? Invest in This Scheme; See Details

PPF

ही एक अतिशय सोपी योजना आहे. येथे रिटर्नसाठी कोणतेही पर्याय नाहीत. यामध्ये 7-8 टक्के फिक्स्ड रिटर्न मिळेल. या योजनेच्या व्याजदराचा प्रत्येक तिमाहीत आढावा घेतला जातो. सध्या PPF वर 7.1 टक्के रिटर्न दिला जात आहे. PPF 15 वर्षात मॅच्युर होते. तसेच यामध्ये 7व्या वर्षी काही पैसे काढता येतील. यासोबतच PPF खात्यावर कर्ज देखील मिळेल. त्याच वेळी या दोन्ही योजनांवर टॅक्स सवलतीचा लाभही मिळतो. Pension

आपल्यासाठी काय चांगले असू शकेल ???

जर आपल्याला जोखीम घेऊन जास्त रिटर्न मिळवायचा असेल तर NPS मध्ये गुंतवणूक करावी. तर दुसरीकडे, जर आपल्याला पैसे सुरक्षित ठेवायचे असतील आणि नियमित रिटर्न मिळवायचा असेल तर PPF जास्त चांगले आहे. Pension

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=55

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचा भाव पहा

Axis Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार जास्त व्याज

Post Office च्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा दुप्पट पैसे

Home : बुकिंग रद्द केल्यास घर खरेदीदारांना होणार नाही जास्त नुकसान, RERA ने बिल्डर्सना दिले ‘हे’ आदेश

EPFO : पीएफचे पैसे जमा झाले नसतील तर अशा प्रकारे करा तक्रार !!!