हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवी मुंबई मेट्रोची सुविधा सामन्यांसाठी मागील महिन्यापासून कुठल्याही मोठ्या उदघाटनाशिवाय सुरु करण्यात आली. नवी मुंबई मेट्रो सेवा बेलापूर ते पेंधर दरम्यान सुरु करण्यात आलेली आहे. पुर्ण मेट्रो लाईनवर एकूण 11 स्थानके असून त्यामुळे नवी मुंबई मधील सामान्यांना या मेट्रोचा मोठा फायदा होताना दिसून येत आहे. त्यामुळे आता त्यामुळे पेंधरपासून पुढे तळोजा एमआयडीसी क्षेत्रात आणखी दोन मेट्रो स्थानकांची निर्मिती करावी, अशी मागणी येथील उद्योजकांनी सिडकोकडे केली आहे.
परिसरातील लोकांची परवड कमी होणार :
पुणे नवी मुंबई परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीत रायगड,मुंबई, ठाणे, तसेच परिसरातील लाखो कर्मचारी रोज जाणे येणे करतात. आजपर्यंत कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसेस पर्याय उपलब्ध होता. त्यामुळे अनेकदा लोकांना अडचणीचा सामना करावा लागायचा.परंतु आता नवी मुंबई मेट्रो सुरु झाल्यामुळे परिसरातील लोकांची परवड कमी होणार आहे.
तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने दिले सिडकोला निवेदन :
गेल्या महिन्यात या मार्गावर प्रवासी सेवाही सुरू करण्यात आली आहे. पेंधर स्थानक तळोजा नोडमध्ये येते. त्यामुळे या मार्गाचा तळोजा एमआयडीसीतील उद्योजक आणि कर्मचाऱ्यांना काहीच फायदा होत नाही. त्यामुळे मेट्रो मार्गाच्या विस्तारिकरणाच्या संदर्भात तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने अलीकडेच सिडकोच्या संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. नव्याने सुरु झालेल्या मार्गात 2 अधिकचे मेट्रो स्थानक बनवून मार्ग तळोजा एमआयडीसी क्षेत्रात विस्तारित करावा अशी मागणी होत आहे. सिडकोने यासंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने तळोजा औद्योगिक क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांची परवड थांबणार आहे.