सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
चोरीच्या गुन्ह्यात मामा- भाच्यासह २ जणांना पोलिसानी ताब्यात घेतलं यावेळी आरोपींकडून ६ लाखांचे दागिने आणि दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. उडतारे ता. वाई याठिकाणी ही चोरी झाली होती. याप्रकरणी भुईंज पोलिसांनी अतिशय शिताफीने आरोपीना जेरबंद केलं.
याबाबत अधिक माहिती अशी की, २४ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी १ ते सायंकाळी ६.३० वाजणेच्या दरम्यान सौ. शुभांगी संजय सावळे वय ४० वर्षे ग. उडतारे ता. बाई या शेतात गेल्या असताना अज्ञात चोरट्याने देवळीत ठेवलेली घराची चावी घेवून बंद घरात प्रवेश करून घरातील कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली असल्याची फिर्याद मी. सावळे यांनी भुईंज पोलिसात दिली होती. सदरची चोरी गावातील कोणीतरी ज्याला घराची चावी कोठे ठेवतात हे माहिती असलेल्या ओळखीच्याच व्यक्तीने केली असल्याचे पोलीसांना सुरुवातीपासूनच संशय होता. घडलेल्या प्रकरणाची चौकशी घराच्या आजुबाजूच्या लोकांच्याकडे केली असता त्याबद्दल कोणालाच काही माहिती नसल्याचे निष्पन्न झाले.
भुईंज पोलीसांनी अतिशय शिताफीने आपल्या विश्वसनीय खब-याकडून सदर चोरीची माहिती घेवून उडतारे गावातीलच योगेश संदीप वावर वय १९ रा. उडतारे या गुन्हेगारानेच चोरी केल्याचे उघडकीस आले. त्याला चोरीच्या गुन्हयात अटक करून विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा कबुल करून चोरीतील सोन्याचांदीचे दागिने त्याचा मामा रमेश दिनकर दुदुरकर वय ४० वर्षे ग सोनगाव ता. जावली याचेकडे विकण्यासाठी दिल्याचे सांगितले. या गुन्हयात रमेश दिनकर दुस्कर याला मुख अटक करण्यात आली असून त्याचेकडे सखोल चौकशी केली असता एक घरफोडी तसेच भुईंज पोलीस स्टेशन हद्दीत २. शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत १ आणि वाई पोलीस स्टेशन हद्दीत १ असे मोटार सायकल चोरीचे एकूण चार गुन्हे उघड करण्यात आले. त्याचप्रमाणे मेढा व सातारा तालुका हद्दीतील मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीबाबत माहिती दिल्याने सदर परिसरातील २ संशयीत आरोपींना ताब्यात घेवून ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला असता त्या सातारा व मेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येकी दोन अशा ४ मोटारसायकल चोरीच्या गुन्हयाची कबुली देवून चोरीच्या मोटारसायकल काढून दिल्या आहेत. सदर संशयीताकडून घरफोडी चोरीचे २ गुन्हे उघड करून २ लाख ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे तसेच चांदीचे दागिने तसेच मोटार सायकल चोरीचे ८ गुन्हे उघड करून ४ लाख रूपये किमतीच्या ८ चोरीच्या मोटारसायकल असा एकून ६ लाख ३० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा अप्पर पोलीस अधीक्षक सातारा बापू वांगर, बाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे खराडे, यांचे मार्गदशनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्गे यांनी आपली भुईंज पोलीस स्टेशनची गुन्हे प्रकटीकरण शाखेची टीम सोबत घेवुन ही कारवाई वशस्वी केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रलदीप भंडारे, पोलीस अंमलदार वापुराव धायगुडे, जितेंद्र इंगुळकर, शंकरराव घाडगे, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, सोमनाथ बल्लाळ, सचिन नलावडे यांनी सहभाग घेतला होता. या सर्वांचे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा अप्पर पोलीस अधीक्षक सातारा बापू बांगर, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे खराडे आदींनी अभिनंदन केले आहे.