सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2 हजार 736 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
काल रात्री आलेल्या रविवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 196 बाधित आले आहेत. तर दुप्पटपेक्षा अधिक जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपचार्थ असलेल्या रूग्णांच्या संख्याही कमी झाली आहे. सोमवारी सायंकाळी घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमुळे आता जिल्ह्यात केवळ 13 हजार 905 जणांवर उपचारार्थ रूग्ण आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत 8 लाख 65 हजार 142 एकूण नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 लाख 75 हजार 788 बाधित आले होते. बरे होवून 1 लाख 57 हजार 944 जणांना घरी सोडण्यात आलेले आहे. तर आजपर्यंत 3 हजार 887 बाधितांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे.