Vande Bharat : आज लाँच होणार 2 नवीन वंदे भारत रेल्वे; कोणकोणत्या शहरांतून जाणार? रुट अन् वेळापत्रक पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे विस्तारण्यासाठी भारतीय रेल्वे सतत कार्यरत आहे. देशभरात अनेक वंदे भारत एक्सप्रेस वेगवेगळ्या मार्गांवरून सुरु असून या माध्यमातून अनेक शहरांना जोडण्याचे आणि प्रवास सोप्पा करण्याचे काम सुरु आहे.  त्यातच आज देशाचे पंतप्रधान 2 नवीन वंदे भारत ट्रेनची भेट देशवासियांना देणार आहेत. आज सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत आणि चेन्नई-कोइम्बतूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील तीन राज्यांतील लोकांना होणार आहे.

1) सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत –

ही वंदे भारत ट्रेन तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला जोडण्याचे काम करेल. सिकंदराबाद पासून तिरुपती पर्यंत धावणाऱ्या या रेल्वेमुळे दोन्ही शहरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे. सिकंदराबाद – तिरुपती ही ट्रेन सिकंदराबादहून सकाळी 6 वाजता सुटेल आणि तिरुपतीला 1.30 वाजता पोहोचेल. तर दुसरीकडे, तिरुपतीहून 15.15 वाजता सुरू होईल आणि 23.45 ला सिकंदराबादला पोचेल. म्हणजेच ही ट्रेन 8 तास 30 मिनिटांत 661 किमी अंतर पार करेल. तेलंगणातून धावणारी ही दुसरी वंदे भारत ट्रेन आहे. यापूर्वी 15 जानेवारी रोजी सिकंदराबाद ते विशाखापट्टणमपर्यंत वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता.

2) चेन्नई ते कोईम्बतूर वंदे भारत एक्सप्रेस

या वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा तामिळनाडूतील कोईम्बतूर, तिरुवरूर आणि नागापट्टिनम येथील लोकांना होणार आहे. बुधवार वगळता आठवड्यातून 6 दिवस ही ट्रेन लोकांच्या सेवेत असेल. असं म्हंटल जात आहे की ही वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 6 वाजता कोईम्बतूर इथून सुरु होईल आणि 12: 10 पर्यंत चेन्नई सेंट्रलला पोचेल. त्यानंतर 2:20  ला परत चेन्नईवरून निघेल आणि रात्री 8:30 पर्यंत कोईम्बतूरला येईल. या दोन ट्रेननंतर देशात वंदे भारत ट्रेनची संख्या 13 झाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही वंदे भारत एक्सप्रेस धावताना आपण पाहू शकतो.