हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून बेस्ट बस (Best Bus) सेवा देण्यात येत आहे. आता याच बसची जागा एसी बस गाड्यांनी घेतली आहे. सर्व प्रवाशांना या एसी बस गाड्यांचा लाभ घेता यावा यासाठी या एसी बस (AC Busवाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काही नव्या मार्गांवर या एसी बस गाड्या सोडण्यात येते. सध्या मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या डबल डेकर ई-बसची संख्या 50 आहे. यातील 30 डबल डेकर बस फोर्ट, नरिमन पॉईंट, कफ परेड येथे धावतात. परंतु या डबल डेकर बसची संख्या वाढवण्याचा निर्णय देखील बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.
200 एसी बस दाखल होणार
सध्याच्या घडीला पाहिला गेलो तर, मुंबई शहरात फोर्ट, नरिमन पॉईंट, कफ परेड या भागांमध्ये 30 डेकर बस धावत आहेत. इतर 20 बस डेपो ते वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला ते अंधेरी,अंधेरी पूर्व स्थानक ते सिप्झमध्ये येथे सुरू आहेत. त्यामुळेच आता बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून एसी डबल डेकरची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऐन उन्हाळ्याच्या काळामध्ये म्हणजेच एप्रिल-मे महिन्यापर्यंत 200 डबल डेकर बस दाखल करण्यात येतील. याचा सर्वाधिक फायदा मुंबईकरांना होईल.
महत्वाचे म्हणजे, मुंबईत दररोज 50 हजारपेक्षा अधिक प्रवासी डबल डेकर बसमधून प्रवास करत असतात. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते परेड मार्गावर 17 हजारपेक्षा अधिक प्रवासी बसने रोज ये जा करतात. बेस्टने नवीन एसी बस धावण्यासाठी काही नवीन मार्गांची निवड केली आहे. यामध्ये मार्गिका क्रमांक 123 चा समावेश आहे. आता या नवीन बस सुरू झाल्या की उन्हाळ्याच्या काळामध्ये प्रवाशांना एसी बसमधून आरामदायी आणि सुखकर प्रवास करता येईल.




