2000 Rupee Notes | 2017 साली मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्र सरकारने 500 आणि 1000 च्या नोटा बंद करून नवीन 500 आणि 2000 रूपयांच्या नोटा चलनात आणल्या. परंतु रिझर्व बँक ऑफ इंडियाने 200 रुपयांच्या नोटेबाबतही मोठा निर्णय घेतलाय. 2000 रुपयांच्या (2000 Rupee Notes) नोटा बदलून देण्यासंदर्भात किंवा जमा करण्यासंदर्भातील हा नियम आहे. आता 1 एप्रिल 2024 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे.
या दिवशी 200 रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये असणार नाहीत. या आधीच सरकारने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासाठी या नोटा बदलून घेण्याबाबत किंवा बँकेत जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु अद्यापही अनेक लोकांनी या नोटा जमा केलेल्या नाही. त्यामुळे 2000 रुपयांच्या (2000 Rupee Notes) नोटा बदलून घेण्याची त्यांनी तारीख देखील वाढवलेली आहे. परंतु तारीख वाढवली असली, तरी 1 एप्रिल रोजी कोणालाही या 2000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार नाही किंवा बदलता येणार नाही.
2 एप्रिलपासून नोटा जमा करण्याची प्रक्रिया सुरू | 2000 Rupee Notes
1 एप्रिलपासून 2024- 25 चे आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या दिवशी सगळे कर्मचारी कामात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे आता RBI च्या कुठल्याही शाखेत 2000 नोटा जमा केल्या जाणार नाही किंवा बदलून घेणार दिल्या जाणार नाहीत; असा निर्णय घेतला आहे. परंतु 2 एप्रिल 2024 पासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती RBI ने त्यांच्या निवेदनात सांगितली आहे. RBI ने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 2000 रुपयांच्या 97.62% नोटा रिजर्व बॅंकेकडे जमा झालेल्या आहेत.
19 मे 2023 रोजी घेतला मोठा निर्णय
रिझर्व बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी नोटा जमा करण्यास सुरुवात केली होती. RBI ने 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत वाढवून दिली होती. परंतु या कालावधीत देखील 2000 रुपयांच्या सगळ्या नोटा जमा झाल्या नाहीत. त्यानंतर पुन्हा एकदा रिझर्व बँक ऑफ इंडियाने ही तारीख काढून दिलेली आहे. परंतु 1 एप्रिल रोजी या नोटा बदलून मिळणार नाहीत, असा निर्णय RBI ने दिलेला आहे.