2000 Rupees Notes | केंद्र सरकारने मागील वर्षी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्या सगळ्या नोटा बँकेत जमा करण्याचे देखील आदेश दिले होते. सरकारच्या या निर्णयानंतर आतापर्यंत 2 हजार रुपयांच्या एकूण 97.65% नोटा रिझर्व बँकेकडे आलेल्या आ हेत आरबीआयने एका प्रसिद्धी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. आता 19 मे 2023 रोजी आरबीआयने देशातून 2 हजार रुपयांच्या नोटा काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.
याबाबत बँकेने म्हटले की, 2 हजार रुपयांच्या (2000 Rupees Notes) नोटा देशात कायदेशीर निविदा राहतील. म्हणजेच आता आरबीआयने या नोटा चलनातून बाहेर काढण्याचे सांगितले आहे त्यामुळे या नोटा आता व्यवहारातून कायमच्या बंद होणार आहेत.
97.62 टक्के नोटा आरबीआयकडे जमा
अधिकृत प्रसिद्धी पत्राद्वारे आरबीआयने म्हटले की, 19 मे 2023 रोजी देशातील 56 लाख कोटी रुपयांच्या 2 हजार रुपयांच्या (2000 Rupees Notes) नोटा चलनात होत्या. आता 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत हा आकडा 8270 कोटी रुपयांवर आला आहे. म्हणजेच 2 हजार रुपयांच्या एकूण नोटांपैकी 97.62 टक्के परत आलेल्या आहेत.
याआधी देखील दिली होती सूचना | 2000 Rupees Notes
यासाठी रिझर्व बँकेने 19 ते 2023 पासून बँकांमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची सुविधा देखील उपलब्ध केली होती. तरीही अनेकांनी 2 हजार रुपयांच्या या नोटा परत केलेल्या नाहीत. आरबीआयच्या हे लक्षात येताच त्यांनी परत नोटा परत करण्याची तारीख वाढवली. त्यांनी ही तारीख सुरुवातीला 7 ऑक्टोबर 2023 केली त्यानंतर 9 ऑक्टोबर 2023 पासून सांगितले की, कार्यालय लोकांकडून या नोटा स्वीकारत नाही.
2000 रुपयांच्या नोटा तात्पुरत्या वापरात
आरबीआयने नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात आलेल्या सर्व 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या चलनाची गरज पूर्ण करण्यासाठी 2 हजारांच्या (2000 Rupees Notes)नवीन नोटा बनवल्या होत्या. इतर नोटांच्या मूल्यांच्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्यामुळे 2018 ते 19 मध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आलेली होती. त्यानंतर या सगळ्या नोटा पुन्हा एकदा आरबीआयकडे देण्याची त्यांनी सूचना दिलेली होती.