Sai Tamhankar : मराठी सिनेविश्वाची श्रीदेवी पुन्हा बॉलिवूड गाजवणार; सई ताम्हणकरच्या ‘डब्बा कार्टेल’चा फर्स्ट लूक रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sai Tamhankar) मराठी सिने विश्वाची अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री बोल्ड आणि ब्युटीफुल सई ताम्हणकर ही कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी बोल्ड अंदाज, तर कधी आगामी प्रोजेक्टमूळे ती चर्चेत येताना दिसते. सईने केवळ मराठी नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वात देखील घट्ट पाय रोवल्याचे दिसून आले आहे. ‘मिमी’ आणि ‘भक्षक’ या सिनेमांनंतर आता ती पुन्हा एकदा बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. माहितीनुसार, मराठमोळी सई ताम्हणकर ‘डब्बा कार्टेल’ या सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

सई ताम्हणकरचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग आहे. जो तिला कायम विविध प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहण्यासाठी आतुर असतो. दरम्यान मराठी सोबत बॉलिवूड सिनेविश्वालादेखील सईच्या सौंदर्यासह अभिनयाची भुरळ पडली आहे. सई ताम्हणकरने अभिनेत्री क्रिती सॅनॉनसोबत ‘मिमी’ तर भूमी पेडणेकरसोबत ‘भक्षक’ या सिनेमांमध्ये अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. यानंतर आता लवकरच सईचे चाहते तिला नव्या वेब सिरीजच्या माध्यमातून महत्वपूर्ण भूमिकेत पाहू शकणार आहेत. या वेब सिरीजचे नाव ‘डब्बा कार्टेल’ असून ही सिरीज एका गंभीर विषयावर भाष्य करताना दिसणार आहे.

अभिनेता फरान अख्तर ही वेब सिरीज नेटफ्लिक्स या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर घेऊन येत आहे. माहितीनुसार फरान अख्तरची ही नवी वेब सिरीज ड्रग्सचा अवैध व्यापार या कथानकावर आधारलेली असणार आहे. या सिरीजमधून सई ताम्हणकर एका वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेतून आपल्या भेटीस येत आहे. तसेच या सीरिजमध्ये सईसोबत अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, अंजली आनंद, निमिषा सजयन, लिलैट दुबे, जिशू सेनगुप्ता आणि गजराज राव असे बडे कलाकार एकत्र पहायला मिळणार आहेत. त्यामुळे एकंदरच ही वेबसिरीज सई ताम्हणकरच्या कारकिर्दीतील अत्यंत मोठा प्रोजेक्ट ठरण्याची शक्यता आहे.

अभिनेत्रीने शेअर केला फर्स्ट लूक (Sai Tamhankar)

अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या या नव्या वेबसीरिजची पहिली झलक दाखवली आहे. तिने ‘डब्बा कार्टेल’ या नव्या सिरीजचा फर्स्ट लूक शेअर करताना यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हा असा डबा आहे ज्याला तुम्ही कधीही विसरू शकत नाही’. माहितीनुसार, ही सिरीज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २०२४ याच वर्षात प्रदर्शित होणार आहे. मात्र अद्याप या सिरीजच्या रिलीज डेट बाबत खुलासा करण्यात आलेला नाही. (Sai Tamhankar)