‘हे’ आहेत २०२० मधील 10 बहुप्रतीक्षित बॉलीवूड चित्रपट….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । वर्षाच्या सुरुवात झाली ती विकी कौशलच्या उरी: द सर्जिकल स्ट्राइक आणि रणवीर सिंग आलिया भट्टचा गल्ली बॉयपासून आणि आता या वर्षाचा शेवट होत आहे सलमान खानचा बहुप्रतीक्षित सिनेमा दबंग 3 ने. पण या सर्व चित्रपटांना मागे टाकत आपण नजर टाकूया पुढील वर्षात म्हणजेच 2020 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या 10 चित्रपटांच्या लिस्टकडे जे ठरू शकतील बॉलीवूडमध्ये सुपरहिट.

2020 मधील तीन बहुप्रतीक्षित चित्रपटांमधील सर्वात पाहिलं नाव म्हणजे आमिर खानचा लालसिंग चड्डाला (हा चित्रपट टॉम हँक्सच्या क्लासिक हिट ‘द फॉरेस्ट गंप’चे अधिकृत रूपांतर आहे) त्याचसोबत, 2020 मध्ये येणारा रणवीर सिंगचा कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित ’83’ आणि अक्षय कुमारचा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांनी देखील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नवीन वर्षात कंगना राणौत हिचे देखील तीन चित्रपट येणार आहेत- अश्‍विनी अय्यर तिवारीचा ‘पंगा’, तमिळनाडूच्या माजी सीएम जयललिता यांचा बायोपिक ‘थलैवी’ आणि ऍक्शनफिल्म ‘धाकड’.

चला नजर टाकूया 2020 मध्ये प्रदर्शित होणारे बहुप्रतीक्षित 10 बॉलीवूड चित्रपट कोणते त्यावर

तान्हाजी

अजय देवगण आणि काजोल यांचा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ हा आगामी चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती आणि मराठा योद्धा तानाजी मालुसरे या वीर नायकावर आधारित आहे. या चित्रपटात सैफ अली खान उदय भानची भूमिका साकारणार आहे आणि 10 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहात हा सिनेमा 3 डी मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने प्रेक्षक उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहेत.

‘छपाक’

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ या चित्रपटात ऍसिड अटक सर्व्हायवर मालती हिच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे. हार्ड-हिटिंग वास्तव दाखवणाऱ्या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना इतकं भावनिक केलं की प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. इरफान खान यांच्या गाजलेल्या ‘तलवार’ नंतर मेघना गुलजार पुन्हा एकदा एक इन्वेस्टिगेटिव्ह कथानक प्रेक्षकांपुढे आणत आहेत. अजय देवगणच्या तानाजी: द अनसंग वॉरियर सोबत छपाक देखील 10 जानेवारीलाच प्रदर्शित होणार आहे.

लव आज कल 2

इम्तियाज अली आणि व्हॅलेंटाईन डे हा एक सुपरहिट कॉम्बो 2020 मध्ये प्रेक्षकांना ‘लव आज कल 2’ च्या रूपाने पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही नवीकोरी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. तसेच हे दोघं डेट करत असल्याच्या चर्चा देखील पाहायला मिळत आहेत. रोमँटिक कॉमेडी असणारा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत आणि 14 फेब्रुवारीला हा प्रदर्शित होणार आहे.

सूर्यवंशी

रोहीत शेट्टीने ‘सिंघम’ या चित्रपटाचा पुढील भाग ‘सिम्बा’ आणताना त्यामध्ये अजय देवगण सोबत रणवीर सिंगला देखील प्रमुख भूमिकेत इंट्रोड्यूस केलं. आणि आता याचंच पुढील व्हर्जन असणार आहे ‘सूर्यवंशी’ ज्यामध्ये, अक्षय कुमार हा एटीएस अधिकारी म्हणून दिसणार आहे. तसेच या चित्रपटात अक्षयची नमस्ते लंडनची सह-अभिनेत्री कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत आहे.

83

माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आणि 1983 चे वर्ल्ड कप हिरो ‘कपिल देव’ यांच्या आयुष्यावर आधारित ’83’ हा चित्रपट असणार आहे. रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे आणि विशेष म्हणजे त्यासाठी त्याने हुबेहूब त्यांचा लुक इमिटेट करायचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट 10 एप्रिलला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंग सोबत दीपिका पादुकोण, बोमन इराणी, ताहिर राज भसीन, साकीब सलीम, अम्मी विर्क जिवा, साहिल खट्टर, चिराग पाटील आणि आदिनाथ कोठारे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

राधे

दबंग नंतर सलमान खान आणि प्रभुदेवा पुन्हा ‘राधे’ नावाच्या आणखी एका चित्रपटासाठी एकत्र दिसणार आहेत. आणि विशेष म्हणजे सलमान खान 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर वॉन्टेडनंतर सलमान खान पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दिशा पटानी ही मुख्य भूमिकेत असून सलमानचा किक चित्रपटातील सह-अभिनेता रणदीप हूडा हा मुख्य भूमिकेत आहे. राधेमध्ये जॅकी श्रॉफ देखील प्रमुख भूमिका साकारणार असून हा चित्रपट 22 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

लक्ष्मी बॉम्ब

अक्षय कुमारने आधीच त्याच्या आगामी हॉरर-कॉमेडी लक्ष्मी बॉम्बमुळे चर्चेत आहे. यात तो ट्रान्सजेंडर ची भूमिका साकारणार असून, या सिनेमात तो त्याची गूड न्यूज या चित्रपटातील सह-अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्यासोबत पुन्हा एकत्र दिसणार आहे. लक्ष्मी बॉम्ब हा 2011 मधील तमिळ चित्रपट कांचनाचा अधिकृत रिमेक आहे. फिल्ममेकर राघवा लॉरेन्स यांनी तामिळमधील चित्रपटाचे व त्याच्या सीक्वलचे दिग्दर्शन केले होते आणि आता बॉलिवूडमधील रिमेकचे दिग्दर्शन देखील तेच करणार आहेत. मुख्य म्हणजे हा चित्रपट, राधेला बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार आहे कारण दोन्ही सिनेमे हे 22 मे रोजीच प्रदर्शित होणार आहेत.

‘गंगूबाई काठीवाडी’

सलमान खान आणि आलिया भट्ट यांच्या इंशा अल्लाह या चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी या सिनेमाची घोषणा केली. हा चित्रपट ‘गंगूबाई काठीवाडी’ यांच्या आयुष्याभोवती फिरत आहे. चित्रपटाचं कथानक, पत्रकार हुसेन झैदी लिखित ‘क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे. गंगूबाई कोठेवली हे मुंबईतील कामठीपुराची जणांनी मानली जाते. 60 च्या दशकात ती एक शक्तिशाली स्त्री होती. आलिया भट्ट ही या चित्रपटात फिमेल लीड असणार आहे परंतु संजय लीला भन्साळी यांनी अद्याप या चित्रपटाच्या नायकाविषयी कोणतीही घोषणा केलेली नाही.

पृथ्वीराज

दिवाळी 2020 मध्ये अक्षय कुमारचा ऐतिहासिक योद्धा सम्राट पृथ्वीराज चौहान याच्या आयुष्यावर आधारित पीरियड ड्रामा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात, 2017 ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ही अक्षय सोबत प्रमुख भूमिका साकारणार आहे. या प्रोजेक्टबद्दल बोलताना अक्षय एका दैनिकाला म्हणाला की, ‘मी पृथ्वीराज चौहान या भारतातील सर्वात निर्भय राजांची भूमिका साकारणार आहे, हा खरोखरच माझा सन्मान आहे. हा चित्रपट 13 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून कंगना राणौत हिच्या ‘धाकड’ ला टक्कर देणार आहे.

लाल सिंह चड्डा

आमिर खानच्या 54 व्या वाढदिवशी, दंगल स्टारने आपला पुढील प्रोजेक्ट जाहीर केला. तो टॉम हॅन्क्सच्या ऑस्कर-विनिंग ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये लाल सिंह चड्डाच्या भूमिकेत दिसणार आहे. चंडीगडमध्ये नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलची सुरुवात झाली आणि आमिरच्या सरदारजी लूकने चाहत्यांना वेडं केलं. थ्री इडियट्स नंतर आमिर पुन्हा एकदा करीना कपूर खान सोबत या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तमिळ अभिनेता विजय सेतुपति आणि मोना सिंग यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सिक्रेट सुपरस्टार फेम अद्वैत चंदन दिग्दर्शित लालसिंग चड्डा 25 डिसेंबर 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment