सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा रुग्णालयात ६ कोरोना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी एका २२ वर्षीय युवकाचा कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मरकज काळात दिल्ली येथे भेट दिलेल्या ५ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असून सातारा जिल्ह्यातील दोन नागरिकांना पुरुष २९ व महिला ४७ वर्षीय यांना जिल्हा रुग्णालयात तर तीन नागरिकांना वय वर्ष २१ ते २५ दोन पुरुष व एक महिला यांना कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
काल जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-19 रुग्णाचे निकट सहवासीत म्हणून 4 ते 68 वर्ष वयोगटातील 12 नागरिकांना (पुरुष-8 व महिला-4) विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच 25 ते 85 वयोगटातील तीन नागरिक (दोन पुरुष व एक महिला) श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 2 ते 54 वर्ष वयोगटातील चार पुरुष नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. वरील सर्व 24 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना आज एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे. दरम्याम, जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ वर पोहोचली आहे. यातील पहिल्या दोघांचे रिपोर्ट काल निगेटीव्ह आले आहेत. तसेच त्यातील एकजणाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग
कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क
शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार