Wednesday, June 7, 2023

22 वर्षीय विद्यार्थिनीची कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नाशिकमधील सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये BAMS च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या एका 22 वर्षीय विद्यार्थीने आत्महत्या केली आहे. श्रुती सानप असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मुळ बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे.

श्रुती सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. हि आत्महत्येची घटना काल दुपारी घडली. मृत श्रुती सानप हिने वस्तीगृहामधील आपल्या खोलीमधील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

मात्र श्रुतीने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने केली शैक्षणिक, की आणखी काही हे अजून समजू शकले नाही. पंचवटी पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.