कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
अमेरिका येथील एरिझोना राज्यातील फिनिक्स येथे अल्ट्रामॅन स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराडच्या वेदांत अभय नांगरे या 22 वर्षीय विद्यार्थ्याने भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करत सहभाग भाग घेतला होता. या स्पर्धेत वेदांत याने यश मिळवल्यानंतर त्याला अल्ट्रामॅन म्हणून सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे अमेरिकेतील या स्पर्धेत सुमारे सात देशातील 21 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यापैकी 16 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. यावेळी स्पर्धेत वेदांत हा एकटाच भारताचे प्रतिनिधित्व करत होता. अमेरिकेतील हवाई स्पर्धेचा अनेक वर्षाचा अनुभव असलेले बिली रिकार्ड्स त्याच्या नावावर होते. त्यांचे विशेष सहाय्य वेदांतला ही रेस पूर्ण करण्यासाठी झाले. या अगोदर वेदांतने जुलै 2022 मध्ये आयर्नमॅन ही स्पर्धा स्वित्झर्लंड येथे यशस्वी पूर्ण केली आहे. अल्ट्रामॅन स्पर्धा अतिशय कठीण अशी समजली जाते.
https://www.facebook.com/vedant.nangare/posts/5984166715007524
जिद्द, चिकाटी, नियोजन, परिश्रम, त्याग, योग्य गुरूंचे मार्गदर्शन तसेच इच्छाशक्तीचे जोरावर वेदांत या स्पर्धेमध्ये यश मिळवू शकला. अल्ट्रामॅन म्हणून सन्मानित झाल्यानंतर खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांनी वेदांतचे फोन वरून अभिनंदन केले. तसेच अनेक भारतातील मित्र, नातेवाईक तसेच अमेरिकेतील अनेक भारतीयांनी वेदांतचे विशेष कौतुक केले.